रत्नागिरी, ता. 06 : भारत निवडणूक आयोगाकडील 18 मे 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका 2026 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे. Uncontested election

भारत निवडणूक आयोगाकडील 2 जानेवारी 2024 मधील आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या तरतुदीनुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने सदर मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी कळविले आहे. Uncontested election