• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 May 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत हळद लागवडीचे प्रशिक्षण

by Mayuresh Patnakar
April 20, 2022
in Guhagar
17 0
0
Turmeric cultivation training in Abaloli
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पं.स. साकारणार नाविन्यपूर्ण प्रकल्प

गुहागर ता. 20 : जिल्हा परिषदेचे रत्नागिरी कृषी  विभागाच्या सहकार्याने पंचायत समिती  गुहागरमार्फत यावर्षीच्या खरीप हंगामात हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम  राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात  SK-4(Special konkan) या हळदीच्या वाणाचा उपयोग  करण्यात येणार आहे. तसेच हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम व हळकुंडापासून रोपे तयार करणे बाबतचे प्रशिक्षण वजा प्रात्यक्षिक दि. 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11.00 वा.आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित केले आहे. अशी माहिती कृषी अधिकारी आर.के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी  गजेंद्र पौनीकर यांनी दिली. Turmeric cultivation training in Abaloli

सदरचे प्रशिक्षण हे मोफत असून या प्रशिक्षणासाठी कोणत्याही  प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही. तरी इच्छुक शेतकरी व  स्वयंसहाय्यता बचत  समूहांच्या  प्रतिनिधींनी या प्रशिक्षण  वजा प्रात्यक्षिक  कार्यक्रमाला  उपस्थित  रहावे, असे आवाहन पं.स.गुहागर च्या कृषी विभागामार्फत  करण्यात आले आहे. Turmeric cultivation training in Abaloli

गेल्या  वर्षी जिल्हा परिषदेच्या कृषी  विभागाने मंडणगड तालुक्यात हळद लागवडीच्या नाविन्यपूर्ण  उपक्रमांतर्गत ‘पथदर्शक प्रकल्प’ राबविण्यात आला होता. SK-4 (स्पेशल कोकण -4) या  हळदीच्या वाणाच्या बियाण्याचा वापर करून हळकुंडापासून रोपे तयार  करून हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला होता. Turmeric cultivation training in Abaloli

याच पद्धतीचा प्रकल्प जिल्हा परिषदेच्या सहकार्याने गुहागर पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुमारे 5 एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येऊन या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पात हळद लागवड ते हळद काढणीपर्यंतचा संपूर्ण कालावधीत तांत्रिक मार्गदर्शन पं.स.च्या कृषी विभागामार्फत  करण्यात येणार आहे. Turmeric cultivation training in Abaloli

या प्रकल्पातील पहिला टप्पा म्हणून डाँ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली कडून विकसीत केलेले हळकुंडापासून रोपे तयार करण्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग या प्रकल्पात करण्यात येणार आहे. यामुळे शेतक-यांना स्वतःचे हळदीचे बियाणे स्वतःच निर्माण करता येणार आहे. तसेच या प्रकल्पात  SK-4(Special konkan) या हळदीच्या वाणाचा उपयोग  करण्यात येणार आहे. Turmeric cultivation training in Abaloli

या प्रकल्पाची प्राथमिक माहिती देण्यासाठी तसेच हळकुंडापासून रोपे तयार करण्याच्या  तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गुहागर तालुक्यातील  इच्छुक  शेतक-यांसाठी पं.स.गुहागरच्या मार्फत हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम’ व ‘हळकुंडापासून रोपे तयार करणे’ बाबतचं प्रशिक्षण  वजा प्रात्यक्षिक दि .22 एप्रिल 2022 रोजी सकाळी  11.00 वा.आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे आयोजित केले आहे. Turmeric cultivation training in Abaloli

या प्रशिक्षण  वर्गाला  गट विकास अधिकारी  डाँ. अमोल भोसले, सहाय्यक गट विकास अधिकारी  प्रमोद केळसकर, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी अधिकारी सर्जेराव कांबळे, हे उपस्थित राहणार आहेत. Turmeric cultivation training in Abaloli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSK-4Special konkanTurmeric Cultivation Training in Abaloliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.