नागपुरमधील 85 वर्षांच्या कोरोनाग्रस्त संघ स्वयंसेवकाने आपला ऑक्सिजन बेड दुसऱ्यासाठी रिकामा केला. परिणाम व्हायचा तोच झाला. नारायण दाभाडकर या आजोबांचे निधन झाले. ही गोष्ट दाभाडकर काकांच्या कुटुंबियांनी कोणालाही सांगितली नव्हती. तरीही आजच्या प्रभावी सामाजिक माध्यमांमधुन दाभाडकर काकांच्या आत्मसमर्पणाची कथा सर्वांसमोर आली. संघ संस्कारांच्या मुशीत घडलेल्या दाभाडकरकाकांनी केलेल बलीदान प्रसिध्दीसाठी नव्हतं. पण त्याची माहिती मिळाल्यावर संघाच्या स्वयंसेवक, हितचिंतक दाभाडकरकाकांच्या आत्मसमर्पणभावासमोर नतमस्तक झाले. संघ संस्कारामधील ताकद पुन्हा एकदा जगासमोर आली.


परंतु हे सत्य पचविण्याची ताकद नसलेल्या संघद्वेषींनी दाभाडकरकाकांच्या आत्मसमर्पणावरच प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. दाभाडकरकाकांच्या कुटुंबाला यातना पोचतील अशी विधाने सामाजिक माध्यमांवर पसरु लागली. लोकशाहीत संघ विचारांच्या विरोधी विचार असु शकतो हे संघाने कधीच नाकारलेले नाही. म्हणूनच आजवर संघाने कधीही आपल्या विरोधकांना प्रतिउत्तर केले नाही. मात्र या घटनेत संघद्वेषी मंडळींनी दाभाडकर कुटुंबावरच चिखलफेक करण्यास सुरवात केली. त्यामुळे अखेर नारायण दाभाडकर यांच्या मुलीला सामाजिक माध्यमांचा वापर करुन सत्यकथन करण्याची वेळ आली. truth-behind-the-dabhadkar-story
( हा व्हिडिओ जसाच्या तसा बातमीखाली पोस्ट केला आहे.)

