• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वरात ६२५ वृक्षांची मियावाकी लागवड

by Mayuresh Patnakar
July 14, 2026
in Guhagar
23 0
0
Tree plantation in Velneshwar
46
SHARES
130
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना मियावाकी जंगल निर्मितीचे आवाहन

गुहागर, ता. 14 : वेळणेश्वर येथील “साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट” च्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि जागतिक तापमानवाढीला आळा घालण्याच्या उद्देशाने मियावाकी पद्धतीने ६२५ स्थानिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पालगत हा पर्यावरणपूरक उपक्रम दोन दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. Tree plantation in Velneshwar

Tree plantation in Velneshwar

हरियाली संस्थेचे सतीश आठले यांच्या मार्गदर्शनाखाली जागेची पाहणी करून मियावाकी जंगल निर्मितीसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली. भाताचे तूस, लेंडी खत, सेंद्रिय खत आणि मातीचे मिश्रण वापरून जमीन तयार करण्यात आली. प्रत्येक रोपाला आधार देण्यासाठी ६२५ काठ्या लावण्यात आल्या असून मोकाट जनावरांपासून संरक्षणासाठी ५० बाय ५० फूट परिसराला ग्रीन नेटचे सुरक्षित कुंपण उभारण्यात आले. या उपक्रमात मुंबईतील ट्रस्टचे कार्यकर्ते, हितचिंतक, देणगीदार, स्थानिक कामगार आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रामपंचायत, संबंधित शासकीय यंत्रणा आणि वन विभागाच्या सहकार्याने आवश्यक रोपे उपलब्ध करून देण्यात आली. मियावाकी पद्धतीमध्ये स्थानिक प्रजातींची झाडे कमी अंतरावर लावली जात असल्याने त्यांची वाढ वेगाने होते. योग्य निगा आणि सेंद्रिय खताच्या वापरामुळे अवघ्या तीन वर्षांत घनदाट जंगल तयार होऊ शकते. या प्रकल्पात परिसराच्या हवामानाशी सुसंगत विविध देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष शरद जोशी यांनी दिली. Tree plantation in Velneshwar

वृक्षलागवडीपलीकडे पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणास्थळ उभारण्याचा ट्रस्टचा मानस असून नागरिकांनी आपल्या परिसरातील छोट्या जागांमध्येही मियावाकी पद्धतीने जंगले निर्माण करून पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. Tree plantation in Velneshwar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTree plantation in Velneshwarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.