प्रवाश्यांना मिळणार तीर्थक्षेत्र ‘पॅकेज’ सवलतीच्या दरात
गुहागर, ता. 29 : सुरक्षित व आरामदायी प्रवासाची हमी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या गुहागर आगारातर्फे तीर्थक्षेत्र पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ग्रुप स्वरूपात नोंदणी करून प्रत्येक व्यक्तीला सवलतीच्या दरामध्ये होणारा तिकीट खर्च यामध्ये सादर करण्यात आला आहे. यामुळे आता जनतेला एसटी संगे तीर्थयात्रा करावयास मिळणार आहे. Travelers will get pilgrimage ‘package’

एस. टी. महामंडळ गुहागर आगारातर्फे एक दिवसाच्या प्रवासामध्ये कोल्हापूर दर्शन करता येणार आहे यासाठी फुल तिकीट रुपये १००० तर हाफ तिकीट रुपये ५०० इतका प्रत्येकी खर्च येणार आहे. एक दिवसात आळंदी दर्शन फुल तिकीट रुपये १४०० तर हाफ तिकीट रुपये ७०० प्रत्येकी खर्च येणार आहे. एक दिवसात आदमापुर दर्शनामध्ये फुल तिकीट रुपये १००० तर हाफ तिकीट रुपये ५०० येणार आहे. दोन दिवसाच्या पॅकेज टूर्समध्ये शिर्डी, शनिशिंगणापूर आणि महाबळेश्वर दर्शन व दुसरा मार्ग अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर दर्शन या पॅकेजमध्ये प्रत्येकी फुल तिकीट रुपये २२०० तर हाफ तिकीट रुपये ११०० अशा सवलतीच्या दरामध्ये हे पॅकेज टूर्स सुरू करण्यात आले आहे. Travelers will get pilgrimage ‘package’
यामध्ये एसटीची आसनक्षमता असलेली ग्रुप पद्धतीने बुकिंग सुविधा देण्यात आली आहे. योजनेनुसार याच बुकिंग मध्ये महिला सन्मान, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक सवलतीचा लाभही देण्यात येणार आहे. याचा जनतेने लाभ उठवावा, असे आवाहन गुहागर आगाराचे स्थानक प्रमुख तथा प्रभारी आगारप्रमुख स्वप्नील शिंदे यांनी केले आहे. Travelers will get pilgrimage ‘package’
