अवैध वाहतुकीमुळे अपघातांचा धोका; उपसरपंच सचिन ओक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील काताळे येथील कॅप्टन दिलीप भाटकर यांच्या मालकीच्या काताळे मरीन सिंडिकेट परिसरातून सुरू असलेल्या जांभ्या दगडाच्या वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांवर अपघातांचा धोका वाढला आहे. ही वाहतूक अवैध आणि धोकादायक असल्याचा आरोप करत कोतळूक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन मुकुंद ओक यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सदर वाहतुकीची चौकशी करून ती तात्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. Transporting stones is dangerous
तक्रारीनुसार, गेल्या चार ते पाच वर्षांपासून काताळे येथून मोठ्या प्रमाणात जांभ्या दगडाची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक कायदेशीर आहे की बेकायदेशीर, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मागील चार वर्षांत आबालोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वळणावर अनेक मोठ्या वाहनांचे अपघात झाले आहेत. सुदैवाने या अपघातांमध्ये जीवितहानी झाली नसली तरी अपघातांचा धोका कायम आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सायंकाळच्या वेळी काताळे येथून आबालोली-कोतळूक-सुरळ मार्गे अथवा तळी मार्गे १६ टायरची मोठी वाहने प्रचंड वेगाने व पूर्ण क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन जात असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. Transporting stones is dangerous
दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास शृंगारतळी-आबालोली रस्त्यावर पांगारी येथील जुगाई देवीच्या वळणावर मोठा अपघात झाला. या वाहनांबरोबर सहकारी मध्यधुंद अवस्थेत असल्याचेही दिसून आल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. अपघाताच्या वेळी वाहनाच्या पुढून किंवा मागून अन्य कोणतेही वाहन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली. Transporting stones is dangerous
रात्रीच्या वेळी तसेच दिवसा मोठ्या प्रमाणात ये-जा करणाऱ्या या वाहनांमुळे रस्त्यावरील लहान-मोठ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वाहनांना साईड न देणे, इंडिकेटर न देणे यांसारख्या तक्रारीही आहेत. किमान २० ते २५ गाड्या लागोपाठ या मार्गावरून रात्रीच्या वेळी जात असल्याने अन्य वाहनचालकांना प्रवास करणे धोकादायक बनले आहे. या जांभ्या दगडाच्या वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे नियम, अटी व निकष पूर्ण केले आहेत का? आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का? तसेच या मार्गावरून किती वजनाची वाहतूक करण्याची परवानगी आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शृंगारतळी-आबालोली-भातगाव तसेच सावर्डे-तवसाळ या मार्गांवरील अवजड वाहतुकीची कायदेशीरताही तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. Transporting stones is dangerous
तवसाळ येथील कोस्टल हायवेच्या पुलाला लागणारे साहित्य नेतानाही अशाच प्रकारच्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विकास आणि रोजगाराला विरोध नसून, तो विकास स्थानिकांच्या जीवावर बेतणारा आणि रोजगार बेकायदेशीर असलेला नको, अशी भूमिका सचिन ओक यांनी मांडली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन वाहतुकीची सखोल चौकशी करावी आणि नियमबाह्य वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Transporting stones is dangerous
