• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 August 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर-चिपळूण अवघड वळणावर ट्रेलर अडकला

by Mayuresh Patnakar
August 26, 2026
in Guhagar
177 1
0
Trailer stuck at a sharp turn
347
SHARES
991
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

काही तास वाहतूक विस्कळीत, सावर्डे पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पूर्ववत

गुहागर, ता. 26 : गुहागर आणि चिपळूण तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या केरे हद्दीत मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. गुहागर तालुक्यातील तवसाळ येथून श्रीवर्धनकडे स्टीलचे अवजड साहित्य घेऊन जाणारा अशोका कंपनीचा एक भलामोठा ट्रेलर कापशी पुलाच्या वरती सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका अवघड वळणावर अडकला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि चढणीच्या अवघड वळणावर ट्रेलरला चढता न आल्याने हा ट्रेलर रस्त्यामध्येच अडकून पडला. Trailer stuck at a sharp turn

Trailer stuck at a sharp turn

या मोठ्या ट्रेलरमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि प्रवाशांना काही तास मनस्ताप सहन करावा लागला. यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर प्रयत्न करून अडकलेला ट्रेलर बाजूला काढला आणि काही तासांनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी आबलोली येथील पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. Trailer stuck at a sharp turn

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTrailer stuck at a sharp turnटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share139SendTweet87
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.