• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणेशोत्सवात शृंगारतळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत

by Ganesh Dhanawade
September 25, 2023
in Guhagar
106 1
0
Traffic is smooth during Ganeshotsav
208
SHARES
595
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

गुहागर, ता. 25 :  गणेशोत्सवा दरम्यान गुहागर तालुक्यातील सतत वर्दळीची असलेली शृंगारतळी बाजारपेठमध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चाकरमानी व स्थानिकांचा अडथळे विना प्रवास व्हावा, यासाठी एकाच वेळी तीन ते चार पोलीस कर्मचारी बाजारपेठेत ग्रस्त घालत होते. Traffic is smooth during Ganeshotsav

Traffic is smooth during Ganeshotsav

यावर्षी एसटी बससह चाकरमनी आपली वाहने घेऊन आपल्या गावी गणेशोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने आलेले आहेत. शृंगारतळी ही तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने सर्व ग्राहक खरेदीसाठी येत असतात. लाखो रुपयांची उलाढाल याठिकाणी होत असते. गणपती काळात देखील हजारो ग्राहक वाहने घेऊन याठिकाणी खरेदीसाठी येत असतात. गुहागर – विजापूर महामार्गाचे काम बाजारपेठेतून पूर्ण झाले असले तरी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमुळे पार्किंग करणे अडचणीचे होऊन जाते. बाजारपेठ मधील रस्त्यावर वाहने लावण्यास जागाच शिल्लक नसल्याने चुकून वाहन चालकाने वाहने उभी केल्यास मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. अशावेळी वादाचे प्रसंग घडतात. जागेची अडचण असताना देखील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते हे अन्य कर्मचारी यांच्या सहकार्याने नम्रपणे नागरिकांशी संवाद साधत आहेत. स्थानिक व मुंबईकर नागरिक पोलिसांच्या विनंतीला मान देत आहेत. Traffic is smooth during Ganeshotsav

सायंकाळी बाजारपेठेत गर्दी होत असते. त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या वाहनांची सुद्धा गर्दी होत असते. परंतु येथील पोलिसांच्या कार्यक्षमतेमुळे सर्व वाहने सुरळीतपणे मार्गस्थ होत आहेत. बाजारपेठेतील शृंगारतळीचा राजा पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. याही भाविकांच्या गर्दीला नियंत्रण करण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे. आज मितीस कोणताही अनुचित प्रकार बाजारपेठेत घडलेला नाही. गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. पवनकुमार कांबळे व अन्य पोलीस कर्मचारी दिवस – रात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेत आहेत. Traffic is smooth during Ganeshotsav

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTraffic is smooth during Ganeshotsavटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.