धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे करणार भूमिपूजन, शिवसेनेमध्ये उत्साह
मयूरेश पाटणकर
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray ) तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर (konkan Tour) आहेत. 29 मार्चला ते गुहागर (Guhagar) तालुक्यातील वेळणेश्र्वरला येत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात समुद्राच्या उधाणाचे पाणी येथील खारवी वस्तीत शिरते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांनी वेळणेश्र्वर खारवीवाडीत 220 मिटर धुपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी केली होती. या कामाच्या मंजुरीमध्ये अनेक अडथळे आले. मात्र आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा करुन हा धुपप्रतिबंधक बंधारा यावर्षी मंजुर केला. 2 कोटी 20 लाखांची प्रशासकीय मान्यता असलेल्या या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे करणार आहेत. Tourism Minister Aditya Thackeray coming to Velneshwar
Tourism Minister Aditya Thackeray coming to Velneshwar
युवासेना प्रमुख (Yuva Sena Chief) आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री म्हणून प्रथमच गुहागरमध्ये येत आहेत. त्याच्यासोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Eduation Minister Uday Samant), रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab), आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav), जिल्हा प्रमुख सचिन कदम व विलास चाळके देखील उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये (Shiv Sena) उत्साहाचे वातावरण आहे. Tourism Minister Aditya Thackeray coming to Velneshwar
त्यांच्या दौऱ्यात शिवसेनेने वेळणेश्र्वरमध्ये जाहीर सभेचे आयोजनही केले आहे. हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी (ता. 25) सौ. नेत्रा ठाकूर यांच्या निवासस्थानी नियोजनाची बैठक झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, जिल्हा परिषदचे माजी उपसभापती महेश नाटेकर, जि.प. सदस्य प्रविण ओक, पंचायत समिती सदस्य रविंद्र आंबेकर, सुनील पवार यांच्यासह शिवसेनेचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. Tourism Minister Aditya Thackeray coming to Velneshwar