अश्विन कुमार ; 4 तास 55 मिनिटांत 20 कि.मी.चे अंतर केले पार
गुहागर, ता. 28 : डोंबिवलीतील अश्र्वीन सारवाना कुमारने ४ तास ५५ मिनिटात अंजनवेल ते असगोली हे २० कि.मी.चे समुद्री अंतर पार केले. या प्रवासात त्याला 3 ते 4 मिटर उंचीच्या लाटांशी दिड तास झगडावे लागले. गुहागर वरचापाट परिसरात जेलीफिशच्या स्पर्शांने त्याच्या हातापायांची आग होवू लागली. या सर्व संकंटाचा सामना करत १३ वर्षांच्या अश्विनने असगोली गाठले. अनुभवी ज्येष्ठ जलतरणपटुचे कौशल्य अश्विनने दाखवले. अशा शब्दात सागर कन्या रुपाली रेपाळे यांनी अश्विनचे कौतुक केले. अश्विनचा हा समुद्रप्रवास पहाण्यासाठी हजारो तालुकावासीय अंजनवेल ते असगोली दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर उभे होते. (13-year-old Ashwin(Student of Rupali Repale swimming academy)swam in Guhagar Sea. He covered the distance of 20 km from Anjanvel to Asgoli in 4 hours and 55 minutes. During this journey, Ashwin encountered 3 to 4 meters high waves. The touch of In the final stage venomous Jellyfish touches to his Hand and leg. He disturb due to pains. But he overcame all these difficulties and reached end point successfully. In this video we recorded his total struggle and achievements. Please watch full video and comments us in you tube comment box.)
विविध विक्रम नावावर असलेल्या रुपाली रेपाळे यांच्या जलतरण अकादमी मधील 13 वर्षांचा अश्विन सारवाना कुमार हा समुद्री जलतरणासाठी गुहागरला आला होता. शुक्रवारी (ता. 26) दुपारी 1 वाजता अंजनवेल येथील जेटीवरुन त्याने समुद्रात उडी टाकली. तत्पूर्वी त्यांच्या शरिराला लाल ग्रीस लावण्यात आले. महाराष्ट्र राज्य स्विमिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे निरिक्षक संतोष पाटील यांनी शिट्टी वाजवल्यावर अश्विनने 1 वाजून 5 मिनिटांनी समुद्रात उडी मारली. अंजनवेल जेटी ते गोपाळगड किल्ल्यापर्यंतचे जलतरण त्याने वेगाने पूर्ण केले.
लाटांशी झुंज
टाळकेश्र्वर मंदिर, गोपाळगड, दिपगृह ते एलएनजी जेटी हे अंतर पार करण्यासाठी त्याला तब्बल दोन तास लागले. किल्ल्याखाली समुद्र व खाडी मिळते त्या परिसरात अश्विनला उंच लाटांचा सामना करावा लागला. टाळकेश्र्वर मंदिर ते लाईट हाऊस पर्यंतच्या पल्ल्यात सुमारे 3 ते 4 मिटर उंचीच्या लाटांसोबत अश्विन झुंजला. लाईट हाऊस ते एलएनजी जेटी लाटांची उंची कमी होती. मात्र पाणी वेगाने हेलकावत होते. हा टप्पा अश्विनसाठी कठीण होता. एलएनजी जेटी ते गुहागर बाग हे अंतर त्याने अवघ्या अर्ध्यातासात पार केले. भरतीची वेळ आणि उत्तरेकडून दक्षिणकडे असलेली वाऱ्याची दिशा या दोन्ही गोष्टी वेगाने अंतर पार करण्यासाठी अनुकुल होत्या. त्यामुळे अश्विनही आता निवांत झाला होता.
तो गुहागकरांसाठी पोहला
पण त्याचवेळी समुद्रातील जेलीफिशचा स्पर्श अश्विनच्या हातापायाला झाला. अश्विन अक्षरश: समुद्रात किंचाळत होता. प्रशिक्षक महाडिक यांनी क्षणार्धात समुद्रात उडी घेतली. अश्र्विनवर उपचार केले. यामध्ये सुमारे 20 मिनिटांचा वेळ गेला. जलतरण संघटनेच्या नियमाप्रमाणे तुम्ही व्यक्तिगत कामगिरी करता त्यावेळी सीमेचे, अंतरांचे बंधन नसते. अर्जात नमुद केलेल्या भागात प्रवेश केल्यानंतर कुठेही किनाऱ्याला येवून जलतरणपटू थांबू शकतो. या नियम सांगून मुख्य प्रशिक्षिका सौ. रुपाली ताई अश्विनला आपण इथे थांबुया असेही सांगत होत्या. मात्र गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेली गर्दी पाहून अश्विनने पुन्हा पोहोण्याचा निर्णय घेतला.
जल्लोषात स्वागत
सायंकाळी 6 वा. तो असगोलीच्या किनाऱ्यावर पोचला. त्यावेळी शेकडो ग्रामस्थांनी जल्लोष करत त्याला उचलून घेतले. हनुमान मंदिरात सुवासींनीनी त्याला ओवाळले. असगोलीचे ग्रामस्थ, मच्छीमार संघटना, भाजपा, क्रिडा संघटना, सदानंद आरेकर प्रतिष्ठान, अपरान्तभुमी पर्यटन आदी संस्थांनी अश्विनचा सत्कार केला.
जलतरणाचा मार्ग पूर्ण केल्यानंतर त्याच्या प्रशिक्षिका रुपालीताई म्हणाल्या की, खाडी आणि समुद्र मिळतो अशा ठिकाणी तरुण आणि अनुभवी जलतरणपटुंचे धाडस, धैर्य आज अश्विनने दाखवले. संयमाने त्याने लाटांशी झुंज दिली. जेलीफिशच्या स्पर्शानंतर लोकांसाठी आपल्याला पोहायचे आहे या भावनेतून लक्ष्य गाठणे निश्चितच कौतुकास्पद आहे.
आईवडिलांचा विश्र्वास
अश्विनला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नौकांमधुन 15 जणांची टीम त्याच्यासोबत होती. त्यामध्ये अश्विनच्या आईवडिलांही समावेश होता. अश्विनची आई म्हणाली की उंच लाटांनी मी घाबरले होते. पण मला खात्री होती की समोर येणाऱ्या सर्व संकटांवर अश्विन मात करेल. वायुदलातून निवृत्त झालेले सारवानाकुमार म्हणाले की, आजची स्थिती थोडी अधिक कठीण आहे. मात्र यापूर्वीही त्याने प्रतिकुल परिस्थितीशी सामना केला आहे. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत.
आता स्पर्धा होतील
महाराष्ट्र जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष, ठाणे जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव आणि आजच्या जलतरणाचे निरिक्षक संतोष पाटील म्हणाले की, गुहागरचा समुद्र धोकादायक आहे. अशी वदंता होती. मात्र आज अश्विनने येथील समुद्र पोहोण्यासाठी उत्तम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे भविष्यात येथे ओपन सी टुर्नामेंटना संधी आहे. जलतरण संघटना देखील अशा स्पर्धांना मान्यता देतील.