गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथे अवैद्यरित्या खैर लाकडाची चोरी होत असल्याची तक्रार दाखल झाल्यावर वन विभागाने कारवाई करत तब्बल एक लाख रुपये किमतीचा खैर सोलीव किटा ४.३२०घ. मी विनापरवाना विनापासी वाहतूक करत असलेला बोलेरो टेम्पो क्र MH08 AP 5236 वाहन लाकुड मालासह जप्त करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यावर कारवाई करण्याकरता वनविभाग चिपळूण यांच्याकडे प्रकरण सादर करण्यात आले आहे. Theft of Khair wood in Palpen

गुहागर तालुक्यामध्ये खुलेआम चालणारी खैरतोड त्याचबरोबर जंगलतोडीने आज जंगलातील वन्य प्राणी रस्त्यावर येत आहेत. आर जी पी पी एल कंपनीने कोणतीही परवानगी न घेता खुलेआम जंगलतोड आपल्या आवारामध्ये सुरू ठेवली आहे. परिणामी आज तेथील रान गवा व बिबटे अंजनवेलच्या मुख्य रस्त्यावर दाखल झाले आहेत. वनविभागाला 25 लाखाची गाडी दिली असून फिरतीसाठी बोट देण्याचे आश्वासन देत कंपनीने आपले उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच परिस्थितीमध्ये गुहागर तालुक्यातील पालपेण येथे खुलेआम खैरतोड होत असल्याची तक्रार कुंभारवाडी तर्फे पालपेणे येथील सोन्या शिवराम पालकर यांनी वनविभाग यांच्याकडे केली होती. Theft of Khair wood in Palpen
त्यानुसार मौजे. कुंभारवाडी तर्फे पालपेणे येथे जावून सोलीव किटा ४.३२०घ. मी विनापरवाना विनापासी वाहतूक करत असलेला बोलेरो टेम्पो क्र MH08 AP 5236 वाहन लाकुड मालासह जप्त करून चौकशीसाठी ताब्यात घेवून श्रीराम सॉमिल खैर येथील शामजी अर्जुन पटेल रा. चिखली ता. गुहागर यांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास चालु असून सदरची कारवाई विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी (चिपळूण), परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण यांचे मार्गदर्शना खाली वनपाल गुहागर व वनरक्षक अडूर यांनी केली. दरम्यान तोड करण्यात आलेल्या खैराची किंमत एक लाख रुपये असून वाहतूक करणारी वाहन पाच लाख किमतीचे आहे या दोन्ही वस्तू वनविभागाने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. Theft of Khair wood in Palpen
