गुहागर, ता. 30 : गुहागर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहीनी पुन्हा एकदा जेसीबीचा फाळका लागून फुटली आहे. नगरपंचायतीचे पाणी व्यवस्थापन करणारे कर्मचारी ही जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी झटत आहेत. पाणी पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची ग्वाही नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिली आहे. The waterline for Guhagar city has once again break due to JCB’s Fork. Guhagar Nagar Panchayat’s water management staff is working hard to repair the Waterline. Mayor Rajesh Bendal has assured that there will be no impact on water supply.
गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे (Guhagar Vijapur National Highway) काम करणाऱ्या मनिषा कन्स्ट्रक्शनने आजपासून गुहागरकडील अर्धवट काम पूर्ण करण्याचे कामाला सुरवात केली आहे. कामाच्या पहिल्याच दिवशी रस्त्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या जेसीबीचा फाळका (JCB’s Fork) लागून जलवाहिनी (Waterline) फुटली. रस्त्याच्या बाजुने जलवाहिनी आहे याची माहिती नगरपंचायतीने याआधी दोन वेळा दिली होती. आजही काम करताना नगरपंचायतीचे कर्मचाऱ्यांनी जलवाहिनी साधारणपणे कुठून आहे हे दाखवून दिले होते. तरीदेखील मनिषा कन्स्ट्रक्शनचे कामगार वेगाने काम होण्यासाठी बेजबाबदारपणे खोदाई करत होते. त्यावेळी एका ठिकाणी जेसीबीचा फाळका जलवाहिनीला लागला. 3 इंचाच्या सीमेंट पाईपचा फुटल्याने रस्त्यावरुन पाणी वाहू लागले. ही माहिती मिळताच तातडीने जलव्यवस्थापन विभागातील कर्मचारी घटनास्थळी आले. बुधवारी सकाळी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून फुटलेली जलवाहिनी जोडण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे.
याबाबत नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले की, सध्याच्या रस्त्याच्या बाजूने असलेली जलवाहिनी हलविण्यासाठी रस्त्याच्या दक्षिणेकडील साईडपट्टी साफ करण्याचे काम मनिषा कन्स्ट्रक्शनद्वारे सुरु आहे. त्यांना काळजीपूर्वक काम करण्यास आम्ही अनेकवेळा सांगितले आहे. तरीदेखील जलवाहिनी फुटली. हे कळताच मी स्वत: त्या ठिकाणी गेलो. आपल्या कर्मचाऱ्यांनाही बोलावून घेतले. रात्री पाणी भरण्यासाठी पंप सुरु होण्यापूर्वी जलवाहिनी जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे गुहागर शहराला बुधवारी सकाळी वेळापत्रकाप्रमाणे पाणी पुरवठा होईल.
दरम्यान मनिषा कन्स्ट्रक्शनने आजपासून गुहागरचे नवे कोर्टापासून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही रुंदीकरणाचे कामाला सुरवात केली आहे. जमीनमालकांना न सांगता खोदाई केल्याने आयत्यावेळी त्यांची धावपळ उडाली. आपल्या हद्दी ठेकेदाराची माणसे घुसू नयेत म्हणून त्यांना अडविण्यात आले.
आम्ही कामाला सुरवात केलेली नाही. आज जेसीबीला अन्य काम नव्हते त्यामुळे रस्त्याच्या कडेची बाजु साफ करण्याचे काम हाती घेतले. जलवाहिन्या टाकण्याचे काम केल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जागा साफ करताना काळजी घेवूनही जलवाहिनी फुटली आहे.
– काताळकर, मनिषा कन्स्ट्रक्शन