डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
डायबेटीस कोणत्या वयात होतो ? त्याची लक्षणे काय ? याची उत्सुकता सर्वांनाच असते. आजच्या व्यस्त दिनचर्येमुळे काहींच्या मनात मला डायबेटीस झाला नसेल अशी चिंताही सतावत असते. म्हणून आपण आज या प्रश्र्नांबद्दल थोडी माहिती देणार आहोत.
At what age does diabetes occur? What are its symptoms? Everyone is curious about this. Today’s hectic routine also makes some people worry that I may not have diabetic. So today we are going to give some information about these questions.
डायबेटीस कोणत्या वयात होतो?
डायबेटीस या आजाराचा व वयाचा कोणताही संबंध नाही. जन्मल्यापासून ते कोणत्याही वयात डायबेटीस होतो.
डायबेटीसची लक्षणे कोणती?
१. लघवीला जास्त प्रमाणात होते.
मधुमेहमध्ये रक्तामध्ये असलेली जास्त साखर (Sugar) कमी करण्यासाठी शरीर पेशीमधून पाणी काढून घेते आणि रुग्णाला वारंवार लघवीला जावे लागते.
२. तहान जास्त लागणे.
शरीरातील द्रव्य पदार्थ जास्त प्रमाणात बाहेर टाकत असल्याने रुग्णाला वारंवार तहान लागते.
३. अतिभूक लागणे.
अन्नापासून मिळणारी साखर (Sugar) वापरल्यास शरीर अक्षम झाल्याने रुग्णाला पुन्हा पुन्हा खावेसे वाटते.
४. दृष्टीत बदल होणे.
अकाली मोतीबिंदू काचबिंदू डोळ्याच्या स्नायूंचा Paralysis (नेत्रपटल विकार) अचानक दृष्टी अधू होणे.
५. हातापायाला मुंग्या येणे.
६. थकवा वाटणे.
७. कोरडी कातडी/ कातडीचे आजार बळावणे.
८. जखमा बऱ्या न होणे.
रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने संक्रमणाचा परिणाम पूर्वी पेक्षा जास्त आढळतो. जखमा लवकर भरून येत नाहीत.
९. कोणतेही इन्फेक्शन चटकन होणे.
आपण डायबेटिक आहात का?
१. शरिरातील साखरेच्या (Sugar Level) प्रमाणाचा तक्ता खाली दिला आहे तो पाहा:


२. HbA1C चे प्रमाण ६.५ पेक्षा अधिक असेल तर आपण डायबेटिक आहात.
३. Glucose Tolerance Test (GTT) मध्ये पोझीटीव्ह असेल तर आपण डायबेटिक आहात.
रत्नागिरीमधील अपेक्स हॉस्पीटलमध्ये मधुमेहींसाठी 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज केवळ 50 रुग्ण तपासण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी 8482948439 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा.
अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी शिबिर
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?