मान्यवरांना खुश करण्याचा खर्च ठेकेदाराच्या माथी
गुहागर, ता. 14 : जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराची सद्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या एका सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांना खुश करण्यासाठी हजारो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. मात्र, या उधळपट्टीचा खर्च संबंधित ग्रामपंचायतीमध्ये कामाचा ठेका घेणाऱ्या ठेकेदारांच्या माथी मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आता संबंधित ठेकेदार या प्रकाराबाबत काय भूमिका घेतात, हे औचुक्याचे ठरणार आहे. The strange governance of the village panchayat in Guhagar


गुहागर तालुक्यातील संवेदनशील, श्रीमंत ग्रामपंचायत आणि सर्व जातीधर्माचे लोक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये काही दिवसांपूर्वी एका कामाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. साधा भूमिपूजनाचा सोहळा असताना हा सोहळा उठावदार आणि आलेल्या मान्यवरांना खुश करण्यासाठी असल्याने ग्रामपंचायतीने तब्बल ८५ हजार रुपये खर्च केले. अल्पोपहारासह हारतुरे, फटाके, बँजो, गाडी भाडे, ड्रायफुड्स, पिण्याचे पाणी, नाष्टा, डिजिटल बॅनर व इतर किरकोळ याचा समावेश आहे. झालेला खर्च ग्रामपंचायत फंडातून करण्यात आली नाही, तर या ग्रामपंचायत क्षेत्रात ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या तालुक्यातील दोन ठेकेदारांना दोघात ही रक्कम देण्यास सांगितली. The strange governance of the village panchayat in Guhagar


या कार्यक्रमाशी या दोन्ही ठेकेदारांचा काही संबंध नसताना सदरील रक्कम या ठेकेदारांच्या माथी मारण्यात आली. एकीकडे खर्चात टाकलेले हारतुरे हे वेगळ्याच माणसाने स्वखर्चाने आणले होते. तर मग ठेकेदारासाठी हा वाढीव खर्च देण्याचा उद्देश काय? असा सवाल केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या या अजब कारभाराची आता उघडउघड चर्चा होऊ लागली आहे. The strange governance of the village panchayat in Guhagar