चिखलीतील घटना, दुचाकीवरुन आणत होते गुहागरला
गुहागर, ता. 30 : लघुशंकेसाठी थांबलेला संशयित आरोपी गुहागर पोलीसांच्या तावडीतून सुटून जंगलात पळाला. (The accused ran in forest) ही घटना शुक्रवारी (ता. 30) सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. गेल्या तीन महिन्यात विविध गुन्ह्यांचा वेगाने तपास लावणाऱ्या गुहागर पोलीसांवर या घटनेने नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे. पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. (The accused ran in forest)
The accused ran in forest
एका गंभीर गुन्ह्यात निगुंडळ (News in Guhagar) येथील शिवराम नारायण साळवी याला पोलीसांनी अटक केली होती. शुक्रवारी (ता. 30) सकाळी त्याला चिपळूण कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. तेथील प्रक्रिया संपल्यावर गुहागरमधील एक पोलीस त्याला दुचाकीवरुन पुन्हा गुहागर पोलीस ठाण्यात घेवून येत होते. दुचाकी चिखली परिसरात आल्यावर सदर संशयित आरोपीने पोलीस कॉन्स्टेबलला लघुशंकेसाठी दुचाकी थांबविण्यास सांगितली. नैसर्गिक क्रियेसाठी पोलीसाने दयाबुध्दीने दुचाकी थांबवली. लघुशंकेचे नाटक करुन शिवराम साळवी दुचाकीपासून थोडा दूर गेला आणि एकमेव पोलीस असल्याची संधी साधली. या पोलीसाची नजर चुकवून त्यांने चिखली परिसरातील दाट जंगलात धुम ठोकली. संशयीत आरोपी शिवराम साळवी हा निगुंडळचा असल्याने चिखलीचा परिसर त्याच्यासाठी रोजच्या नजरेखालचा आहे. त्यामुळे दाट जंगलातील अनेक पायवाटा त्याला माहिती आहेत. त्याचाच फायदा त्याने घेतला. (The accused ran in forest)
Police are searching The accused
या घटनेमुळे गुहागर (Guhagar) पोलीस ठाणे मात्र चांगलेच हादरुन गेले. मुळात दुचाकीवरुन आरोपीची ने आण करण्यावरच प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या तीन महिन्यात गुहागर पोलीसांनी अनेक गुन्ह्यांचा शोध वेगाने लावला आहे. त्यामुळे गुहागर पोलीसांची प्रतिमा उंचावली आहे. त्याचवेळी ही घटना घडल्याने गुहागर पोलीस (Police) ठाण्यातील सर्वच पोलीस चिंतेत आहेत. सदर आरोपीला कमीत कमी कालावधीत पकडण्याचा चंग पोलीसांनी बांधला आहे. वेगवेगळ्या टीम चिखली ग्रामस्थांच्या मदतीने जंगल परिसराची कसुन तपासणी करत आहेत. गुहागर चिपळूण रस्त्यावर नाका बंदी करण्यात आली आहे. (The accused ran in forest)
Guhagar News, Marathi news, Police, Guhagar,