गुहागर, ता. 31 : तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटनक्षेत्र वेळणेश्वर येथील श्री. वेळणेश्वर मंदिराला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे हे वेळणेश्वर येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यासाठी उपस्थित होते. या ठिकाणीच त्यांनी श्री. वेळणेश्वर मंदिराला भेट दिली. Thackeray’s visit to Velneshwar Temple


यावेळी उच्चतंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant), पालकमंत्री अनिल परब (Guardian Minister Anil Parab), खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut), आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav), माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव (Z.P. President Vikrant Jadhav), जि.प.सदस्या नेत्रा ठाकूर (ZP Member Netra Thakur) व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री. वेळणेश्वर देवस्थान समितीच्यावतीने सचिव संजय गुरव यांच्या हस्ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना शाल, श्रीफळ व वेळणेश्वर देवाची प्रतिमा देवून स्वागत करण्यात आले. Thackeray’s visit to Velneshwar Temple


तसेच श्री. वेळणेश्वर मंदिर सुशोभिकरणासाठी व पर्यटन वाढीसाठी पर्यावरणमंत्री व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. श्री. वेळणेश्वर मंदिर हे पर्यटन स्थळाच्या कुठच्या श्रेणीमध्ये बसते. याची माहिती देवस्थान समितीकडून घेतली. सदर मंदिराला (ब) श्रेणीचा दर्जा असल्याची माहिती देवस्थान समितीने दिली. वेळणेश्वर गावाचे ग्रामदैवत श्री. कालभैरव मंदिरात जावून त्यांनी दर्शन घेतले. Thackeray’s visit to Velneshwar Temple
काही वर्षापूर्वी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हॅलिकॉप्टरद्वारे वेळणेश्वर मंदिराची व परिसराची पाहणी करून छायाचित्रणही केले होते. या छायाचित्रणाची एक प्रतिमाही त्यांनी देवस्थानला भेट दिली होती. त्याचीही आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. आदित्य ठाकरे यांच्या समवेत दोन दिवसांत मी तात्काळ जिल्हाधिकारी व महाराष्ट्र टूरीझमचे अधिकारी तसेच प्रांत यांच्याकडे चर्चा करून या संदर्भात ब दर्जाच्या पर्यटन विकासांतर्गत कोणत्या योजना येतात याची माहिती घेऊन त्याचे प्रस्ताव तयार करून आदित्य ठाकरे यांचेकडे मंजुरीसाठी देवून जास्तीत जास्त निधी देवू असे आश्वासन दिले. Thackeray’s visit to Velneshwar Temple

