(भाग 7)
डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर फोन करावा.
आजच्या भागमध्ये आपण डायबेटिससाठी कोणत्या तपासण्या करायच्या ते पाहूया. (What tests should a diabetic do?)
1) मधुमेही असा शिक्कामोर्तब झालेल्या लोकांसाठी नियमित करावयाच्या तपासण्या.
2) नुकताच मधुमेही म्हणून सापडलेल्या रुग्णाच्या प्रारंभिक तपासण्या.
3) pre –diabetic अथवा मधुमेहाच्या संभाव्य रुग्ण.
यासाठी आवश्यक तपासण्या कोणत्या याचा विचार आपण या लेखामध्ये करणार आहोत.
आपण आधीच्या लेखात मधुमेहाचे प्रकार पहिले. या सर्व प्रकारात type २ मधुमेहाचे प्रमाण मोठे असून ते ९५ % इतके आहे.
प्रयोगशाळेत रोगनिदान, फॉलोअप चाचण्या आणि आजारामुळे शरीरात गुंतागुंत झाली असल्यास ती ओळखण्यासाठी करावयाच्या चाचण्या.
प्रत्येक आजारामध्ये मुख्यत्वे करून पुढील प्रकारच्या तपासण्या रोगनिदानासाठी केल्या जातात.
1) क्लिनिकल डायग्नोसिस – डॉक्टरांनी रुग्णाची केलेली शारीरिक तपासणी.
2) रेडीओलोजिकल इन्वेस्टीगेशन यामध्ये क्ष –किरण , MRI, सोनोग्राफी, एन्जिओग्राफ़ि या प्रकारच्या तपासण्या येतात.
3) पॅथोलोजीकल डायग्नोसिस- लघवी, विविध प्रकारच्या रक्त तपासण्या
क्लिनिकल डायग्नोसिस डायबेटिक पेशंट मध्ये डॉक्टरांद्वारे केल्या जाणाऱ्या तपासण्यामध्ये डॉक्टर नेमके काय बघतात, हे आपण पाहू,
नाडीची गती,
ब्ल्डप्रेशर ,
श्वसनाचा दर,
फुट एक्झामिनेशन (पायाची तपासणी ) ,
हाताच्या व पायाच्या संवेदना तसेच तेथील पायाच्या रक्तवाहिन्या नीट चालू आहेत का ?
डोळ्याची तपासणी (रेटीना बघितला) जातो.
वजन, BMI(BASAL METABOLIC RATE) इ. बघितले जातात.
अशा सामान्यपणे तपासण्या आहेत.
मोफत शिबीराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक
रत्नागिरीमधील अपेक्स हॉस्पीटलमध्ये मधुमेहींसाठी 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज केवळ 50 रुग्ण तपासण्यात येणार आहेत. नोंदणीसाठी 8482948439 या मोबाईल क्रमांकावर फोन करावा.
आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
अपेक्स हॉस्पिटलमध्ये मोफत रुग्ण तपासणी शिबिर
https://guhagarnews.com/free-camp-for-diabetic-patients-at-apex-hospital-ratnagiri/
भाग पहिला : डायबेटीस म्हणजे काय ?
https://guhagarnews.com/what-is-diabetes/
भाग दुसरा : डायबेटीसची लक्षणे कोणती ?
https://guhagarnews.com/the-symptoms-of-diabetes/
भाग तिसरा : डायबेटीस होण्याची कारणे
https://guhagarnews.com/causes-of-diabetes/
भाग चौथा : डायबेटीसचे प्रकार
https://guhagarnews.com/types-of-diabetes/
भाग ५ : मधुमेहाच्या जवळ आपण आहात का?
https://guhagarnews.com/are-you-close-to-diabetes/
भाग 6 : माझी वाटचाल मधुमेहाकडे?
https://guhagarnews.com/my-journey-towards-diabetes/
(Diabetes, Apex Hospital, Ratnagiri, Lifestyle, Diabetic, जनजागृती, Awareness, मधुमेह, मधुमेही,)