जळगावच्या कार्यकर्ता विकास वर्गात एलपीजीला पर्याय; पर्यावरणपूरक व किफायतशीर शेगडीची चर्चा
गुहागर, ता. 25 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्राच्या कार्यकर्ता विकास वर्ग (प्रथम)चे आयोजन सध्या खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या एम. जे. कॉलेज येथे करण्यात आले आहे. एकवीस दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात 255 स्वयंसेवक शिक्षार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यासोबतच 40 ते 50 कार्यकर्ते विविध व्यवस्थांमध्ये कार्यरत आहेत. अशा जवळपास 700 ते 800 जणांच्या रोजच्या (दोनवेळा) भोजन व्यवस्थेचे मोठे आव्हान वर्गासमोर होते. मात्र, संघाच्या कार्यपद्धतीप्रमाणे पर्यावरणपूरक, स्वदेशी आणि कमीतकमी खर्चातील पर्याय शोधण्याचा प्रयत्न यंदा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. Team’s innovative experiment to save fuel
देशात इंधन बचतीबाबत सातत्याने चर्चा सुरू असताना आणि पंतप्रधानांनीही इंधन बचतीचे आवाहन केलेले असताना, जळगावच्या या वर्गामध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहायला मिळत आहे. इराण-अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती आणि उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. Team’s innovative experiment to save fuel
साधारणतः 700 ते 800 जणांच्या स्वयंपाकासाठी दररोज किमान दोन मोठे एलपीजी गॅस सिलेंडर लागण्याचा अंदाज होता. प्रत्येक सिलेंडरचा खर्च विचारात घेतला असता, प्रति दिवस जवळपास 6 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. संपूर्ण एकवीस दिवसांच्या वर्गासाठी तब्बल सव्वा लाख रुपयांपर्यंत गॅस खर्च जाण्याची शक्यता होती. मात्र, संघाच्या व्यवस्थापकांनी यावर पर्यायी उपाय शोधला. Team’s innovative experiment to save fuel

धुळे येथील स्वयंसेवक राहुल कुलकर्णी यांनी विशेष प्रकारची शेगडी तयार करून दिली. या शेगडीत एलपीजीऐवजी नूतनीकरणक्षम ऊर्जास्त्रोताचा वापर करण्यात आला आहे. कपाशी किंवा तुरीच्या वाळलेल्या झाडांपासून (तूरखाटी) व गायीचे शेण मिश्रित तयार केलेले ‘वूड ब्लॉक्स’ हे या शेगडीचे मुख्य इंधन आहे. त्यामधून धूर होत नाही हे विशेष. बाजारात प्रत्येकी सुमारे तीन रुपये प्रतिकिलो उपलब्ध असलेले हे वूड ब्लॉक्स/ ब्रिक्स 150 ते 200 रुपये गोणी या दराने सहज उपलब्ध होतात. Team’s innovative experiment to save fuel
या प्रयोगामुळे ज्या ठिकाणी दररोज 6 हजार रुपयांचा एलपीजी खर्च अपेक्षित होता, त्याच ठिकाणी आता अवघ्या 300 रुपयांमध्ये स्वयंपाक पूर्ण होत आहे. म्हणजेच दररोज मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होत असून खर्चातही लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे हा पर्याय केवळ स्वस्त नाही, तर पर्यावरणपूरकही आहे. शेतीमधील उरलेला जैविक कचरा उपयुक्त इंधनामध्ये रूपांतरित होत असल्याने पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे. Team’s innovative experiment to save fuel
सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केले विशेष कौतुक
सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी वर्गस्थानी तीन दिवस उपस्थित राहिले. वर्गातील सर्व व्यवस्था व उपक्रमाची त्यांनी विस्तृत माहिती घेतली. शेगडीचा प्रयोग त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिला. त्याची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी या अभिनव प्रयोगाचे विशेष कौतुक केले. “असा प्रयोग आपण देशभरात सुरू असलेल्या संघ शिक्षा वर्ग व अन्य कार्यक्रमात देखील करू. याविषयी मी स्वतः जळगावच्या प्रयोगाची माहिती सांगेल” असे ते म्हणाले.
संघाच्या विविध प्रशिक्षण वर्गांमध्ये शिस्त, नियोजन आणि स्वावलंबन यांना नेहमीच महत्त्व दिले जाते. जामनेर येथील संघ शिक्षा वर्गात सुद्धा ह्याच शेगडीचा वापर सुरू आहे. त्यामुळे जळगाव व जामनेर येथील या प्रयोगामुळे “कमी खर्चात प्रभावी व्यवस्थापन” याचा एक आदर्श समोर आला आहे. ग्रामीण भागात, मोठ्या सामूहिक कार्यक्रमांमध्ये किंवा सामाजिक उपक्रमांमध्येही अशा पर्यायी इंधन व्यवस्थेचा वापर होऊ शकतो, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि स्वदेशी तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम घडवणारा हा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. Team’s innovative experiment to save fuel
