आमदार जाधवांचे सुक्ष्म नियोजन यशस्वी, युतीच्या गोटात शांतता
गुहागर, ता. 04 : Tatkare Wins Raigad Constituency. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. यावेळीही रायगडमधुन त्यांना महायुतीची साथ मिळाली. गुहागर आणि दापोली विधानसभा क्षेत्राने मात्र मतांचा कौल अनंत गीतेंच्या पारड्यात टाकला. गुहागरमध्ये गीतेंना 27 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे आमदार जाधव यांनी गीतेंच्या प्रचाराचे केले सुक्ष्म नियोजन यशस्वी झाले आहे. केंद्रात एनडीएला 300 पारही करता आले नाहीत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच भक्कम राहीली. त्यामुळे तटकरे विजयी झाले असले तरी गुहागरमधील महायुतीच्या गोटात शांतताच पहायला मिळाली.
Tatkare Wins Raigad Constituency
प्रचारादरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी केवळ दोन प्रचार सभा घेतल्या. या दोन्ही प्रचार सभांमधुन आमदार जाधव मी कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघातील प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केल्याचे ठामपणे सांगत होते. तरीही महाविकास आघाडीतून आमदार जाधव यावेळी दुर्लक्ष करत आहेत अशी चर्चा सुरु होती. मात्र अनंत गीतेंना मिळालेल्या मताधिक्याने आमदार जाधव यांचे सुक्ष्म नियोजन यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. विधानसभेत मताधिक्य मिळाले असले तरी येथील दोन्ही उमेदवार पराभुत झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना राज्यातील यशाचा आनंद लुटता येत नव्हता. Tatkare Wins Raigad Constituency
Loksabha मतमोजणीचे कल समोर येऊ लागले तेव्हा सकाळच्या वेळात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सामाजिक माध्यमांमधुन वेगवेगळ्या ठिकाणच्या निकालांची चर्चा सुरु होती. मात्र दुपारनंतर NDA 300 जागांपर्यंतच पोचत असल्याचे लक्षात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने (INDIA) जोरदार मुसंडी मारल्याचे समोर येऊ लागले आणि महायुतीच्या गोटात शांतता पसरु लागली. Tatkare Wins Raigad Constituency
सायंकाळी Raigad Loksabha लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे आणि Ratnagiri Sindhudurg Loksabha मतदारसंघातून BJP Candidate नारायण राणे विजयी झाल्याच्या बातम्या झळकु लागल्या तरीही गुहागर तालुक्यातील महायुतीमधील वातावरण थंडच होते. कारण रायगडमधुन तटकरे विजयी झाले असले तरीही गुहागर विधानसभा मतदारसंघात महायुतीला असलेली किमान मताधिक्याची शक्यताही फोल ठरली. गुहागर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अनंत गीतेंना ७४ हजार ८२६ मते मिळाली तर सुनील तटकरे यांना ४७ हजार ३० मते मिळाली. अनंत गीतेंना २७ हजार ७९६ मते अधिक मिळाली.
Tatkare Wins Raigad Constituency
गीतेंच्या मताधिक्यांने महायुतीच्या वल्गना पोकळ ठरल्या. येथून किमान 2500 ते 3 हजार मतांचे मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा येथील भाजप कार्यकर्ते करत होते. त्यातच महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा असल्याचे निकालातून समोर आले. आणि केंद्रातही 400 पारच्या घोषणा देणाऱ्या एनडीएला जेमतेम 295 पर्यंत पोचता आले आहे. भाजपला अपेक्षित संपूर्ण बहुमताचा आकडाही गाठता आलेला नाही. त्यामुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील सहा महिन्यानंतरची लढाई अधिक कठीण असल्याची जाणिव भाजप कार्यकर्त्यांना झाली आहे. या जाणिवेनेच भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. मात्र रत्नागिरी सिंधुदूर्गमध्ये नारायण राणेंचा विजय आणि रायगडमधुन सुनील तटकरेंचा विजय झाल्याने आनंद व्यक्त करण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांपर्यंत पोचल्या आणि सायंकाळी 6 नंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुहागर नाक्यात, शृंगारतळी बाजारपेठ व आबलोली बाजारपेठेत फटाके फोडले. Tatkare Wins Raigad Constituency