एका चार्जिंगमध्ये धावणार 590 कि.मी.
गुहागर, ता. 05 : टाटा मोटर्स पुन्हा एकदा सिएरा इलेक्ट्रीक कार सारखी दिसणारी नवी कार बाजारात आणणार आहे. ऑटो एक्स्पो 2020 (Auto Expo2020) मध्ये जुन्या टाटा सिएरा (TATA Sierra) SUV चे नवे इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट (Electric Concept) मॉडेल प्रदर्शित करुन टाटाने सर्वांनाच चकीत केले. गेल्या दोन वर्षात या कारवर काम सुरु असताना कंपनीने या संदर्भातील कोणतीही माहिती माध्यमांवर येणार नाही याची काळजी घेतली होती. Tata’s New Electric Car


इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये ‘टाटा’ चांगली कामगिरी करत आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) च्या ‘नेक्सन ईव्ही’ (Nexon EV) व टिगोर ईव्ही (Tigor EV) या दोन गाड्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. Tata’s New Electric Car


Tata’s new electric car
ऑटो एक्स्पो 2020 मध्ये बदल ओळखा या टॅगलाईन सह एक टीजर प्रकाशित केला. त्यामधुन टाटाची नवी इलेक्ट्रीक कार 6 एप्रिल 2022 ला बाजारत येत सर्वांना कळले. या टीजरमधील गाडी टाटाच्या जुन्या सिएरा प्रमाणे दिसते. त्यामध्ये अनेक छोटे छोटे बदल करण्यात आले आहेत. एकावेळी केलेल्या चार्जिंगमध्ये ही कार 590 कि.मि. धावेल असे सांगण्यात आले आहे. (Tata’s new electric car)


टाटाने 90 च्या दशकात सिएरा, सफारी या लांब गाड्या बाजारात आणल्या होत्या. या दोन्ही गाड्यांची जाहीराती लोकप्रिय झाल्या. परंतु अपेक्षाप्रमाणे गाड्याची विक्री झाली नाही. त्यामुळे या दोन्ही मॉडेलचे उत्पादन थांबवावे लागले होते. Tata’s New Electric Car


पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने जनता वैतागली आहे. वाहन चालक, मालकांचा ओढा आता सीएनजी (CNG) किंवा इलेक्ट्रिक (Electric Car) गाड्या खरेदीकडे आहे. ग्राहकांचा हा कल लक्षात घेऊन वाहन कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यास सुरवात केलीय. या पार्श्र्वभुमीवर आता नव्या रुपात येणाऱ्या सिएरा सदृष्य इलेक्ट्रीक SUV कारचे स्वागत देश कसे करतो हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Tata’s new electric car)