विद्यालयाचा निकाल 100 टक्के, 122 विद्यार्थी उत्तीर्ण
गुहागर, ता. 17 : तालुक्यातील रखुमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेतचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला. या विद्यालयातील 122 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. कु. तन्वी सुधाकर वहाळकर हिने 98.60 टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळवला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे संचालक प्रशांत पालशेतकर, मुख्याध्यापक मनोज जोगळेकर यांनी अभिनंदन केले आहे.
Rakhumabai Pandurang Palshetkar Vidyalaya, Palshet’s 10th (SSC Exam) result was 100 percent. 122 students of this school had appeared for the matriculation examination. Ms. Tanvi Sudhakar Wahalkar has secured the first position in the school with 98.60 percent marks. Prashant Palshetkar, Director, Rayat Shikshan Sanstha and Manoj Joglekar, Headmaster have congratulated all the students.
रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेतमधील 122 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 69 मुलांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. 41 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. विद्यालयातील एकही मुलगा दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला नाही.
या विद्यार्थ्यांमध्ये तन्वी सुधाकर वहाळकर हीने 98.60 टक्के गूण प्राप्त करत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. ऐश्वर्या प्रमोद वेलणकर या विद्यार्थीनीने 95.40 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला. तर भूमी मनोज साळवी आणि अनघा संजय ढोर्लेकर या दोघींनी 94 टक्के गुण मिळवत शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच दहावीचा निकाल जबाबदारीने पूर्ण करणाऱ्या इ. 10 वी अ च्या वर्गशिक्षिका सौ. एस. आर. कोळी मॅडम, 10 वी ब चे वर्गशिक्षण ए. व्ही. सावर्डेसर यांचे विशेष अभिनंदन केले आहे. रयत शिक्षण संस्थेचे संचालक प्रशांत पालशेतकर यांनी देखील विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळा समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील शाळेचा 100 टक्के निकाल लागल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.