गुहागर, ता. 10 : गुजरातमधील अहमदाबाद येथे दि. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेत लोटेमाळ येथील कु. तन्वी रेडीज हिने भारताचे प्रतिनिधित्व करत दैदिप्यमान कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. Tanvi Reddy wins gold medal
डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथे विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीने जगभरातील विविध देशांतील अव्वल खेळाडूंमध्ये झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट योगकौशल्य, संतुलन, लवचिकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर अव्वल स्थान मिळवले. तिच्या या यशामुळे भारताचा तिरंगा जागतिक मंचावर अभिमानाने फडकला. Tanvi Reddy wins gold medal

तन्वी ही पाग व्यायामशाळा, चिपळूण येथे प्रशिक्षण घेत असून, तिच्या या यशामागे प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि परिश्रम लाभले आहेत. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळेच तन्वीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश संपादन केले आहे. तन्वीच्या या ऐतिहासिक यशामुळे लोटेमाळ गाव, रत्नागिरी जिल्हा, डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीचे हे सुवर्ण फळ असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. Tanvi Reddy wins gold medal
तन्वीवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे कोकणातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे. Tanvi Reddy wins gold medal
