सुदैवाने भाड्याच्या खोलीत शाळा भरत असल्याने दुर्घटना टळली
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवली आगरवाडी अंगणवाडी शाळेची इमारत अखेर कलंडली आहे. काही दिवसांपूर्वी सदर इमारत अत्यंत धोकादायक बनली असल्याचे वृत्त गुहागर न्यूजने प्रसिद्ध केले होते. यानंतर संबंधित विभागाकडून इमारतीची पाहणी देखील केली होती. मात्र बुधवारी रात्री ही इमारत एका बाजूने कलंडली. Talwali Anganwadi building collapsed


बुधवारी गुहागर पं. स.चे सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली होती. मात्र बुधवारी रात्री ही इमारत अखेर एका बाजूने कलंडली आहे. सुदैवाने सध्या विद्यार्थ्यांना भाड्याच्या खोलीत शिक्षण दिले जात आहे. अनेक वेळा याबाबत पाठपुरावा करूनही संबंधित विभाग याकडे गांभीर्याने बघत नसल्याने ग्रामस्थ व पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. Talwali Anganwadi building collapsed


गेले अनेक वर्षे ही इमारत धोकादायक बनली आहे. याबाबत आम. भास्कर जाधव, तत्कालीन जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव आदींकडे पालक व ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता. तर आवश्यक असणारे प्रस्ताव देखील एकात्मिक बालविकास प्रकल्प तसेच संबंधित विभागाकडे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठविण्यात आले. मात्र निधीची उपलब्धता नसल्याचे सांगून संबंधित विभागाकडून अद्यापही सदर इमारत दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. सदर इमारत पूर्णपणे धोकादायक बनली असून अक्षरशः मोडकळीस आल्याचे अनेक वेळा प्रसिद्धी माध्यमातून आले. मात्र प्रशासनाला याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याने अखेर ही इमारत एका बाजूने कोसळण्यास सुरुवात झाली आहे. Talwali Anganwadi building collapsed