अध्यक्षपदी भरत शेटे तर उपाध्यक्षपदी नवनीत ठाकुर यांची निवड
गुहागर, ता. 04 : गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि 1 ऑक्टोबर रोजी स. 11:30 वा कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवनात संपन्न झाली. यावेळी सन 2023-24 ते 2028 या पाच वर्षाचे कालावधी करता नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. Taluka Bhandari Samaj New Executive Committee


सभेच्या सुरवातीला उपस्थितांचे सचिव निलेश अनंत मोरे यांनी स्वागत केले. व सभा अध्यक्ष भरत शेटे यांच्या परवानगीने सभेला सुरवात करण्यात आली. मागिल सभेचे इतीवृत व वार्षिक जमा खर्च सहसचिव निलेश गोयथळे यांनी सभेपुढे सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ऑडिटर म्हणून सी ऐ सुमेध करमरकर यांची निवड करण्यात आली. Taluka Bhandari Samaj New Executive Committee
यावेळी सन 2023-24 ते 2028 या पाच वर्षाचे कालावधी करता नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष भरत शेटे, उपाध्यक्ष नवनीत ठाकुर, सचिव निलेश मोरे , सहसचिव निलेश गोयथळे, खजिनदार तुषार सुर्वे, व कार्यकारिणी सदस्य म्हणून अमोल वराडकर, प्रदिप सुर्वे, प्रविण जाधव,दिपक पाटिल, सतीश मोरे,नरेश पोळेकर, विद्याधर गोयथळे, संतोष वराडकर, मुरलीधर बागकर, प्रमोद भोसले, दशरथ भोसले, जगन्नाथ बागकर, मयुरेश पावसकर, अमोल गोयथळे, सागर मोरे,श्रीधर बागकर, जयदेव मोरे, संजय गडदे, दिपक शिलधनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. Taluka Bhandari Samaj New Executive Committee