• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे येथे स्वरचैतन्य ग्रुपची सुरमयी दिवाळी पहाट

by Guhagar News
November 15, 2023
in Guhagar
117 1
0
Swarchaitanya Group's Diwali Pahat at Khodde
229
SHARES
654
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील खोडदे सहाणवाडी सभागृह येथे चित्र-शिल्प प्रदर्शनासह स्वरचैतन्य ग्रुपच्या वतीने सूरमयी पहाट उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच मंडळाच्या वतीने ऑनलाईन किल्ला बनवा स्पर्धेचे ही आयोजन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे दिवाळीत मंडळाच्या वतीने विविध कला, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात.  Swarchaitanya Group’s Diwali Pahat at Khodde

ही दिवाळी पहाट गायक गीतेश पांचाळ, कौशल पिलवळकर, संजना गांगण, मेघना मोरे, हार्मोनियम वादक गिरीश पांचाळ, पखवाज वादक सुरज तिवरेकर, तबला वादक चेतन पांचाळ, झांज वादक संदेश पांचाळ यांनी सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक्षा पांचाळ यांनी केले. रंगत कलांची, संगत सुरांची हे ब्रीदवाक्य घेऊन आकारास आलेल्या स्वर चैतन्य ग्रुपच्या वतीने सहाव्या वर्षी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Swarchaitanya Group’s Diwali Pahat at Khodde

यावेळी नांदी, भक्ती गीते, अभंग, गवळण, भावगीते आदी विविध बहारदार गीतांनी ही पहाट कलाकारांनी रंगवली. तसेच कौस्तुभ सुतार यांनी रांगोळी प्रात्यक्षिके सादर करताना ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांची रेखाटलेली रांगोळी उपस्थितांची दाद मिळवून गेली. उपस्थित कला रसिकांचे आणि कलाकारांचे आभार मानण्यात आले. Swarchaitanya Group’s Diwali Pahat at Khodde

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSwarchaitanya Group's Diwali Pahat at Khoddeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share92SendTweet57
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.