जिल्ह्यातील ५६१ गावांत सर्वेक्षण: मार्च २०२७ पर्यंत काम पूर्ततेचे आदेश
रत्नागिरी, ता. 03 : ग्रामीण भागातील जमिनींचे अचूक सर्वेक्षण करून मालमत्ताधारकांना अधिकृत हक्क मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात भूमिअभिलेख विभागातर्फे ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने व्यापक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ५६१ गावांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. मार्च २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. Survey with the help of drone technology
दरम्यान, विभागाचा विस्तार आणि कामाचा वाढता व्याप लक्षात घेता नव्या आकृतिबंधानुसार प्रशासनात महत्त्वाची विशेष उपाधीक्षक भूमिअभिलेख गावठाण आणि निवासी अधीक्षक भूमिअभिलेख ही नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत. ड्रोन सर्वेक्षणामुळे ग्रामीण भागातील मिळकतींचे डिजिटल नकाशे तयार होणार असून, सीमांविषयीचे वाद कायमचे मिटण्यास मदत होणार आहे. प्रशासकीय स्तरावर झालेल्या या पदनिर्मितीमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागाचे कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान होणार असल्याचे दिसून येत आहे. Survey with the help of drone technology
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वामित्व’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील गावठाण भागांचे आधुनिक ड्रोनद्वारे मापन केले जात आहे. आतापर्यंत ५६१ गावांपैकी ३० गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, १७० गावांमध्ये ‘ग्राउंड शूटिंग’चे (प्रत्यक्ष जमिनीवरील रेखांकन व पडताळणी) काम पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचे काम वेगाने सुरू असून, कामातील खंड टाळण्यासाठी आणि तातडीचे कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मार्च २०२७ ची डेडलाईन गाठण्यासाठी भूमिअभिलेख यंत्रणा पूर्णक्षमतेने कार्यरत झाली आहे. स्वामित्व योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश करताना भूमिअभिलेख विभागाची पुनर्रचना केली जात असून, नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत आहे. या नव्या रचनेमुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी मिळणार आहे. Survey with the help of drone technology
अधीक्षक भूमिअभिलेख पद निर्माण करणार प्रशासकीय सुधारणांअंतर्गत ‘विशेष उपाधीक्षक भूमिअभिलेख (गावठाण)’ या नव्या पदाची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच ‘निवासी अधीक्षक भूमिअभिलेख हे अत्यंत महत्त्वाचे पदही लवकरच निर्माण होणार आहे. नवीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता होणार असल्याने प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा होईल आणि भूमिअभिलेख विभागाच्या दैनंदिन कामकाजाला कमालीची गती प्राप्त होईल. Survey with the help of drone technology
