राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवारांची घोषणा
Guhagar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीतून मोठी घोषणा केली. Supriyatai and Patel working president of NCP राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र यामध्ये अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी शरद पवार यांनी दिलेली नाही. यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते.
Supriyatai and Patel working president of NCP
आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये पक्षाचा मेळावा बोलावण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये भाषणाच्या शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करुन सर्वांनाच धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule व खासदार प्रफुल्ल पटेल MP Praful Patel यांची नियुक्ती जाहीर केली. तसेच महाराष्ट्रासह, पंजाब, हरियाणा या तिन राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर व गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड व गोवा या राज्यांची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांचेकडे सोपविल्याची घोषणाही शरद पवार यांनी केली. Supriyatai and Patel working president of NCP
रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव याबरोबर ओडिशा व पश्चिम बंगाल या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून पक्षाच्या शेतकरी आणि अल्पसंख्यांक विभागाचा प्रभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नंदा शास्त्री याच्याकडे दिल्ली प्रदेशाध्यक्ष पद तर फैसल यांच्याकडे तामिळनाडू, तेलंगना, केरळ राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Supriyatai and Patel working president of NCP
या घोषणेनंतर सायंकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी दोघांची निवड करण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे सध्या कोणतीही मोठी जबाबदारी नव्हती. पक्षांतील अनेक ज्येष्ठ सदस्यांनी या दोन्ही नावांना पसंती दिली होती. मी आज फक्त निर्णय जाहीर केला. मी यापूर्वीच पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास तयार होतो. त्याचे कारण इतरांच्या हाती जबाबदारी सोपविणे हेच होते. पक्षातील कार्यकर्त्यांसह अन्य पक्षांनीही राजीनाम्याला विरोध केला. पण आता सर्व राज्यांत पोचण्यासाठी विविध सहकाऱ्यांना जबाबदारी देवून काम वाटून घेतले आहे. Supriyatai and Patel working president of NCP
अजित पवारांविषयी पत्रकारांनी प्रश्र्न विचारला असता अजित पवारांकडे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते हे पद आहे. जयंत पाटील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही. असे पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान शरद पवार यांच्या दिल्लीतील घोषणेनंतर माध्यमांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.’ ‘आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन! ‘ असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. Supriyatai and Patel working president of NCP
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन त्यांच्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी आणि प्रफुल्लभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. Supriyatai and Patel working president of NCP
आज दादा हजर, ताई गैरहजर
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादीच्या आजच्या मेळाव्याला राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार उपस्थित होते. मात्र दिल्लीतील प्रत्येक कार्यक्रमात आवर्जुन उपस्थित असणाऱ्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे मात्र आजच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. Supriyatai and Patel working president of NCP