गुहागर, दि.12 : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेला अधिक चांगल्या प्रकारे जपावे लागते. जरी आपण उन्हापासून आपल्या त्वचेचाबचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी, सनग्लासेस आणि मास्क वापरत असलो तरी सुद्धा आपण अजून काळजी घेणे गरजेचे आहे. Sunscreen for skin protection


उन्हाळ्यामध्ये त्वचेचे चांगले संरक्षण करण्याकरता सनस्क्रीन शिवाय दुसरा कोणताच पर्याय आपल्याकडे नाही. आतापर्यंत सनस्क्रीनचे महत्व जास्त प्रमाणात अधोरेखित केले जात नव्हते. एवढचं काय तर अनेक पुरुष हे सनस्क्रीनला उन्हाळ्यात वापरण्याचे मॉईश्चरायझर समजायचे. परंतु, आता हा भ्रम दूर करणे खूप गरजेचे आहे. कारण, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे हे खूप गरजेचे आहे. Sunscreen for skin protection


सनस्क्रीन आवश्यक का आहे ?
भारतीय पुरुषांनी त्वचेसाठी सनस्क्रीनचा वापर करणे हे अतिशय गरजेचे आहे. आपल्या देशात सूर्याची किरणे ही सरळ रेषेत आणि तीव्र स्वरुपात पडतात. शिवाय आपल्याकडे प्रदूषणाचे प्रमाण ही जास्त आहे. तीव्र उन्हामुळे तुम्हाला सनबर्न, स्किन पिग्मेंटेशन, त्वचेचा कॅन्सर यांसारखे आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे सनस्क्रीन तुम्हाला यांसारख्या आजारांपासून वाचवू शकते. Sunscreen for skin protection
तस पाहिलं तर आपल्या त्वचेला उन्हामुळे खूप त्रास होतो. त्यामुळे हिवाळा असो की उन्हाळा तुम्ही नेहमीच तुमच्याजवळ सनस्क्रीन लोशन ठेवा. तुम्ही जरी उन्हामध्ये घाम गाळत असाल किंवा समुद्र किनाऱ्यांवर आराम करत असाल तरी सुद्धा तुम्ही सनस्क्रीन लावणे हे गरजेचे आहे. जर तुम्हाला सनबर्नसारखा त्रास झाला तर यावर सर्वात आधी सनस्क्रीन नेहमीच कामी येईल. Sunscreen for skin protection
उन्हामुळे त्वचेला होणारा त्रास, परिणाम यांची शास्त्रीय माहिती वाचायची असल्यास इथे Click करा.

