भारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श शिक्षक पुरस्कार
रत्नागिरी, ता. 05 : भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरातील शिक्षक सुधीर शिंदे यांना भारत शिक्षण मंडळाचा रघुनाथ स्मृति आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी शिंदे यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले. तसेच सौ. ईशा रायंगणकर, लिपिक सौ. स्नेहा दांडेकर, संगणक शिक्षिका सौ. मंजिरी गुणे, शिक्षकेतर कर्मचारी मुरलीधर शिवगण यांना देखील उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले. Sudhir Shinde Awarded Ideal Teacher


यावेळी भारत शिक्षण मंडळ कार्यकारी मंडळ सदस्य धनेश रायकर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, श्री. शिंदे यांची आई सुरेखा शिंदे, पत्नी सौ. स्मिता, मुलगी समृद्धी, मावशी आरती साळवी व सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शिंदे यांनी शाळेसाठी भेट मुख्याध्यापिका सौ. कदम यांच्याकडे सुपुर्द केली. Sudhir Shinde Awarded Ideal Teacher

