प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाले यश; गावात आनंदाचे वातावरण
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील आंबेरे खुर्द गावासाठी अभिमानाची बाब ठरावी असे यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गावातील तब्बल चार विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे आंबेरे खुर्द गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. Students of Ambere Khurd are eligible for scholarship exam.
शिष्यवृत्ती परीक्षेत राज अवेरे, आकांक्षा अवेरे, समर पाते आणि सार्थक सुर्वे यांनी उल्लेखनीय यश मिळवत पात्रता प्राप्त केली आहे. त्यांच्या मेहनतीला, शिक्षकांच्या मार्गदर्शनाला आणि पालकांच्या पाठबळाला या यशाची जोड मिळाल्याने सर्व स्तरांतून या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांनी दिलेले खंबीर सहकार्य हे महत्त्वाचे घटक ठरले. हे यश केवळ विद्यार्थ्यांचे नसून संपूर्ण शाळा, पालक, शिक्षक आणि गावकऱ्यांचे सामूहिक यश असल्याची भावना व्यक्त होत आहे. Students of Ambere Khurd are eligible for scholarship exam.
ऋतुजा अवेरे आणि हर्षदा अवेरे या विद्यार्थिनी अत्यंत कमी गुणांच्या फरकाने पात्रतेपासून वंचित राहिल्या. मात्र, त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांच्यातील गुणवत्ता लक्षात घेता भविष्यात त्या निश्चितच उज्ज्वल यश संपादन करतील, असा विश्वास शिक्षक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यांनाही पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Students of Ambere Khurd are eligible for scholarship exam.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे आंबेरे खुर्द गावाची शैक्षणिक परंपरा अधिक बळकट झाली असून आगामी काळातही अशाच प्रकारे अधिकाधिक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश मिळवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावकऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Students of Ambere Khurd are eligible for scholarship exam.
