रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे सन २०२६-२७ मधील विविध शिष्यवृत्ती परीक्षा, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष राजन मलुष्टे, मुख्याध्यापिका सौ. संजना तारी, जी. जी. पी. एस.च्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर तसेच पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष गोरीवले यांची प्रमुख उपस्थित होते. Students felicitated at Jambhekar School
इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल अक्षरा खामकर, आर्या दरडे, योगिता नवरंगे, दुर्वा जोशी, साईराज मडके व सक्षम मोसमकर यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या समीक्षा लिंगायत, वैभवी नखरेकर, आर्यन झोरे तसेच मुख्याध्यापिका संजना तारी यांचा गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. Students felicitated at Jambhekar School

एन.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या उत्तरा कदम आणि मार्गदर्शक शिक्षक धनाजी वाघमोडे, शुभांगी अभ्यंकर, वैभवी नाखरेकर, गुरव, समीक्षा लिंगायत, अनिल चव्हाण, राजेश कांबळे व समीक्षा कमलाकर लिंगायत यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पाचवीतील भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या युवराज कारकर – जिल्ह्यात प्रथम, नमिता सागवेकर – जिल्ह्यात द्वितीय, मेघना जंगम – केंद्रात द्वितीय आणि हर्षल सचिन पेडामकर – केंद्रात प्रथम या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. Students felicitated at Jambhekar School
इयत्ता सहावीतील आस्था बाहुतुले केंद्रात प्रथम आणि मेघना जंगम केंद्रात द्वितीय या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. अक्षरगंगा परीक्षेत उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल युवराज कारकर याचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पूनम नाटेकर, श्रीमती दळवी व पल्लवी शेटे यांचाही गौरव करण्यात आला. Students felicitated at Jambhekar School
इयत्ता सातवीतील आर्या सावंत व आस्था बाहुतुले यांनी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती दळवी, आर्यन झोरे, सुनयना गुरव व अनिल चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. Students felicitated at Jambhekar School

तसेच इयत्ता सातवीतील आर्या दरडे, योगिता नवरंगे, साईराज मडके व अक्षरा खामकर यांनी भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणारे आर्यन झोरे, अनिल चव्हाण, समीक्षा कमलाकर लिंगायत व दिव्यता नागवेकर यांचाही सत्कार करण्यात आला. Students felicitated at Jambhekar School
संस्था अंतर्गत नाट्यवाचन स्पर्धेच्या गट क्रमांक १ मध्ये (इयत्ता ५ वी ते ७वी) प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या अचल चवरे हिचा गौरव करण्यात आला. गट क्रमांक २ मध्ये (इयत्ता ८वी ते १०वी) सक्षम मोसमकर याने तृतीय क्रमांक, तर साईराज मडके याने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणारे प्रयोगशाळा सहाय्यक सचिन साठे यांचाही गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरपरिषदेतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत यश मिळविणाऱ्या रिया आकाश शिंदे, भूमी लिंगायत व कियांश गोरीवाले यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणारे अनिल सागवेकर यांचाही गौरव करण्यात आला. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीतर्फे आयोजित ‘वंदे मातरम्’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पूनम नाटेकर व मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. Students felicitated at Jambhekar School
टेनिस क्रिकेट असोसिएशनमार्फत आयोजित स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेल्या शिवतेज धुळप, नयन आंबेकर व अनुराग सनमरे या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे क्रीडा शिक्षक महेंद्र पवार यांचाही गौरव करण्यात आला. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीतर्फे आयोजित देशभक्तीपर नृत्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सेजल मिस्त्री, निधी शिंदे, तनिष्का मोहिते, आर्या पुजारे, सानिया झोरे, स्वरा मुरकर, कियांश गोरीवाले, दुर्वांग चव्हाण व आर्या दरडे या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या समीक्षा लिंगायत व पूनम नाटेकर यांचाही गौरव करण्यात आला. Students felicitated at Jambhekar School
प्रमुख पाहुणे राजन मलुष्टे यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचा आनंद घेत असतानाच भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सोनाली पाटणकर यांनी भविष्यातही शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका दिव्यता नागवेकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समीक्षा लिंगायत यांनी मानले. Students felicitated at Jambhekar School
