गुहागर, ता. 07 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या सचिवपदी तृतीय वर्ष कला वर्गातील विद्यार्थी कु. साहिल आग्रे याची सर्वानुमते निवड करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी महाविद्यालय विद्यार्थी मंडळाची नियुक्ती मुंबई विद्यापिठाच्या याआधीच्या परिपत्रकानुसार करण्यात आली. Student Board Selection in Patpanhale College
या विद्यार्थी मंडळात गतवर्षी गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून सर्व उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थ्यांना विविध वर्गाच्या प्रमुखपदी तसेच विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यानुसार प्रथम वर्ष कला वर्गप्रतिनिधी रोहीलकर वसुंधरा विलास, प्रथम वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी बेटके प्रणय प्रमोद, द्वितीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी भुवड समीक्षा रमेश, द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी साल्हे सामिया मुस्तफा, तृतीय वर्ष कला वर्गप्रतिनिधी कुलकर्णी आदिती अभिजित, तृतीय वर्ष वाणिज्य वर्गप्रतिनिधी साळवी दिक्षा ज्ञानेश्वर यांची निवड केली गेली. Student Board Selection in Patpanhale College

महाविद्यालयातील क्रीडा विभाग विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. खोचाडे निखील रवींद्र, एनएसएस विभाग प्रतिनिधी म्हणून कु. आग्रे साहिल दिलीप, सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी म्हणून कु. पाष्टे रणजित यांची नियुक्ती करण्यात आली. प्राचार्य प्रतिनिधी म्हणून तृतीय वर्ष कला वर्गातील वेद्रे तन्वी अनिल तर तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील भेकरे ऋतुजा दिलीप यांची नियुक्ती करण्यात आली. कु.साहिल आग्रे याने विद्यार्थी मंडळ प्रतिनिधी होण्याची इच्छा व्यक्त केली असता अदिती कुलकर्णी हिने त्याच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि रोहीलकर वसुंधरा हिने सर्वानुमते त्याला अनुमोदन दिल्यावर प्राचार्य डॉ. देसाई यांनी कु. आग्रे साहिल याची विद्यार्थी मंडळ सचिवपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. Student Board Selection in Patpanhale College
महाविद्यालय विकासात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे असे आवाहन करताना सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतील. यासाठी विद्यार्थी मंडळाने प्रयत्न करावेत अशा शुभेच्छा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी विद्यार्थी मंडळाच्या सचिव तसेच सर्व विद्यार्थी प्रतिनिधीना दिल्या. यामध्ये महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे आणि डॉ. जालिंदर जाधव सहभागी झाले होते. Student Board Selection in Patpanhale College