गुहागर, ता. 07 : तालुक्यातील भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थी व व्यक्ती यांचा गुणगौरव समारंभ व समाजातील महिला भगिनींकरता हळदीकुंकू समारंभाचे आयोजन दिनांक 16 ऑगस्ट रोजी 10.30 वाजता कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. Student appreciation by Bhandari Samaj
सन 2025 – 26 या वर्षातील दहावी बारावी पदवीधर राज्य राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तसेच नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद व नगरपंचायत यामध्ये निवडून आलेल्या भंडारी समाजातील प्रतिनिधींचा गुणगौरव सोहळा या समारंभात संपन्न होणार आहे. Student appreciation by Bhandari Samaj
या समारंभाला प्रभाकर आरेकर, सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, नगरसेवक अमोल गोयथळे, उमेश भोसले, समीर बागकर, कवी राजेंद्र आरेकर, केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, कुसुमाकर बागकर, भूषण मोहन बागकर, भंडारी समाजाचे अध्यक्ष नवनीत ठाकूर व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. तरी भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली नावे 10 ऑगस्ट पर्यंत भंडारी भवन गुहागर येथे द्यावीत, असे आव्हान सचिव निलेश मोरे यांनी केले आहे. Student appreciation by Bhandari Samaj
