• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरमध्ये पावसाचा दमदार प्रवेश

by Manoj Bavdhankar
June 9, 2026
in Guhagar
147 1
0
Strong arrival of rain in Guhagar
288
SHARES
824
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अनेक ठिकाणी घरांवर झाडे, वीजवाहिन्या तुटून वीजप्रवाह खंडीत होण्याचे प्रकार

गुहागर, ता. 09 : गुहागर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडासहित पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे अनेक दिवस गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तर शेतकरी वर्गाने आपल्या पुढील कामाच्या नियोजनास सुरुवात केली. मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. Strong arrival of rain in Guhagar

Strong arrival of rain in Guhagar

पहिल्याच मोसमी पावसात गुहागर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्याने घरांवर झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. तसेच वीजखांब वाकणे, रस्त्यावर येणे, वीजवाहिन्या तुटणे त्यामुळे वीज खंडीत होऊन काही काळ गावे अंधारात राहणे असे प्रकार घडून आले. या आपत्तीत कुठेही जीवितहानी घडलेली नाही. काही रस्त्यांच्या कडेने केबल टाकण्यासाठी केलेली खोदाई व चर व्यवस्थित न बुजविल्याने असे रस्ते वाहतुकीसाठी जीवघेणे ठरले आहेत. Strong arrival of rain in Guhagar

Strong arrival of rain in Guhagar

तालुका आपत्ती निवारण प्रशासन या घटनांवर लक्ष ठेऊन असून उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहे. तालुक्यातील मौजे पालशेत येथील प्रदीप गणपत बेंदरकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून जवळपास 16 हजार रुपये, मौजे गुहागर येथील तुकाराम जांगळी यांच्या घराचे, गुहागर येथे सुनील वराडकर यांच्या घराचे, गुहागर येथील सुहास सुर्वे यांच्या घराचे, आंबेरे खुर्द येथील शशिकला रणपिसे यांच्या घराचे, गुहागर येथील अनिल वराडकर यांच्या घराचे, वरवेली येथील सुषमा गुरव यांच्या घरावर आंबा कलम पडून 50 हजाराचे नुकसान, जांभारी येथील स्वप्नाली सुर्वे यांच्या घराचे, गुहागर येथील अनिल कीर यांच्या घराचे, गुहागर येथील विवेक पाटील यांच्या घराचे, पालशेत येथील राजश्री साळवी यांच्या घरावर फणसाचे झाड पडून घराचे नुकसान झाले. Strong arrival of rain in Guhagar

Strong arrival of rain in Guhagar

गुहागर शहरात 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर गुहागर तालुक्यातील हेदवी  86, आबलोली  35, तळवली 130 अशी एकूण 282 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 56. 4% पाऊस तालुक्यात पडला.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarStrong arrival of rain in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share115SendTweet72
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.