मत्स्यव्यवसाय आयुक्तांचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला आश्वासन
गुहागर, ता. 20 : पावसाळ्यात कोकण किनारपट्टीत अवैध होणाऱ्या मासेमारीवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय आयुक्त मुंबई यांनी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांच्या नेतृत्वाखील शिष्टमंडळाला दिले. दि. १७ जून रोजी या शिष्टमंडळाने मुंबई येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयात आयुक्तांची भेट घेतली होती. Strict action against illegal fishing


किनारपट्टीत अवैध पावसाळी मासेमारी सुरु असताना कोणतीही कारवाई होत नाही. आपल्यावर राजकीय दबाव आहे काय? नसेल तर कारवाई होत का नाही. कोस्ट गार्ड, नेव्ही, सागरी पोलिस, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, कस्टम, स्थानिक पोलिस यांना अधिकार दिले असताना शासनाच्या छाताडावर बसून अवैध मासेमारी होते कशी? यांना हिंमत येते कुठून असे अनेक प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केले. Strict action against illegal fishing


यावर आयुक्त किशोर तावडे यांनी अवैध मासेमारीवर कारवाई केल्याचे सांगत पुढेही कारवाई सुरुच राहील असे सांगितले. तसेच आम्ही पालघर व ठाणे जिल्ह्यातील गस्ती नौका सुरु करित आहोत,असे आश्वासन दिले. तसेच मच्छिमारांसाठी नवीन योजना आलेल्या आहेत. त्या देखील नव्याने आलेल्या योजना लागू करण्यासाठी काम सुरु असून यासाठी कार्यशाळादेखील सुरु केल्या आहेत, असे सांगितले. या शिष्टमंडळात समितीचे कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी, जयेश भोईर, भुवनेश्वर धनु, भूषण निजाई, प्रफुल तांडेल, जयंत तांडेल उपस्थित होते. Strict action against illegal fishing