गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील ते बार्गशीप एल ॲण्ड टी कंपनीचा
गुहागर, ता. 08 : शहरातील समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी एक बार्ग शीप (मालवाहू जहाज) वाहत आले त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाची धावपळ उडाली. सदर बार्ग शीप हे आरजीपीएल परिसरात समुद्रात नांगरून ठेवलेले एल ॲण्ड टी कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुहागर वरचापाट मोहल्ला परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी रात्री एक मालवाहू जहाज (बार्ग शीप) वाहून आले. मंगळवारी (ता. 7) सकाळी या बार्ग शीपचा फोटो सामाजिक माध्यमांवर प्रसारीत झाला. त्यानंतर सदर बार्गशीप कोणाचे याबाबतची चौकशी सुरु झाली. मात्र मंगळवारील पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा अतिवृष्टीने तालुक्यात कुठे काय घडते आहे यावर लक्ष ठेवून होत्या. परिणामी शासनाकडून अधिकृतरित्या सदर जहाजाबाबत माहिती मिळत नव्हती. मंगळवारी सायंकाळी हे मालवाहू जहाज (Barge ship) अंजनवेल येथील एल ॲण्ड टी (L&T) कंपनीचे असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सकाळी (ता. 8) तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील बार्जची पहाणी केली. त्यावेळी एल ॲण्ड टी कंपनीचे अधिकाऱ्यांनी सदर बार्गशीप आपल्या मालकीचे असल्याचे सांगितले.
एल ॲण्ड टी कंपनीद्वारे आर.जी.पी.पी.एल. जेटी परिसरात समुद्रात भिंत ((Break Water Wall) बांधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी मोठे दगड समुद्राच्या तळाशी टाकण्यात येत आहेत. हे दगड आरजीपीपीएल जेटी हेड परिसरात एल ॲण्ड टी ने बांधलेल्या जेटीवरुन समुद्रात नेण्याचे काम या बार्ग शीप द्वारे केले जाते. सध्या काम बंद असल्याने ते बार्ग शीप आरजीपीपीएल परिसरात जेटी हेडच्या शेजारी असलेल्या एल ॲण्ड टी जेटीच्या बाजूला अरबी समुद्रात नांगर टाकून उभे होते. समुद्रातील वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बार्गशीपचा नांगर तुटला व ते भरकटले. बार्ग शीपमध्ये कोणतीही व्यक्ती नव्हती. त्यामुळे जीवीत हानी झालेली नाही. अशी माहिती एल ॲण्ड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी दिली.
L&T Officer Radhakrishnan Said, RGPPPL by L&T Company is constructing of Break Water Wall in sea near RGPPPL jetty area. Large boulders are being laid at the bottom of the sea for this purpose. The Large boulders are transported to the sea from the jetty built by L&T in the RGPPL jetty head area through this Barge ship. As the work is currently closed, the barge ship is anchored in the Arabian Sea near L&T jetty. Due to strong wind in the sea, the plow of the barge ship broke and it strayed.