गुहागर, ता. 18 : कोकणात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत असताना रानटी जनावरांच्या त्रासांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून रानटी जनांवरांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी जागते रहो चा ईशारा दिला आहे. भात लोंबी वर येऊ लागली आहे. त्यामुळे वानरांचा व माकडांचा त्रास सहन करावा लागत आहे. वर्षभर मेहनत करून घेतलेले पिक वाया जावू नये. यासाठी शेतकऱ्यांनी जागते रहो चा नारा दिला आहे. काही ठिकाणी मचाण उभारून त्याठिकाणी येणाऱ्या रानटी जनावरांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. “Stay Awake” solution of farmers in Konkan

कोकणात मोठया प्रमाणात भातशेती केली जाते. भात शेतीबरोबर नाचणी, वरी, कांग तसेच इतर शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. नदीकाठच्या भाताबरोबर डोंगर उतारावरही शेती केली जाते. मात्र शेती करत असताना रानटी जनावरांचा त्रास सहन करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. माकड व वानरांचा त्रास सहन करावा लागत असताना गवारेडे व रान डुक्करांचा त्रास सहन करावा लागत आहे. रानडुक्करांचा होणारा त्रास लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतात बुजगावणी उभारली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात रानडुक्करांचा त्रास कमी झाला आहे. “Stay Awake” solution of farmers in Konkan