मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (After Cabinet Meeting Chief Minister Uddhav Thackeray announced, In Maharashtra, State Government will provide Free Vaccine to the Citizens of 18 to 44 Age.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे.
लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी. कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यासंदर्भात प्रशासनाला सूचना केल्या आहेत. सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल. लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. त्यावेळी लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात झाली तेव्हा गुहागर न्यूजने एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमुळे 18 ते 44 वयोगटातील तरुणांना लसीकरण कसे होते याची माहिती मिळेल. या व्हिडिओ मुद्दाम पहा.