डॉ. विनय नातू, गुहागरमधील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिला विश्र्वास
गुहागर, ता. 11 : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या लढ्याला जनतेचा पाठींबा मिळावा. सरकारकडून आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर अन्याय होवू नये. आंदोलकांचे मनोधैर्य लढा यशस्वी होईपर्यंत टिकून रहावे. यासाठी भाजपाने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष, माजी आमदार डॉ. विनय नातूंनी केले. ते एस.टी. कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी गुहागरमध्ये आले होते. The struggle of S.T. employees should get the support of the people. The government should not be unfair to the employees participating in the agitation. The morale of the protesters should be maintained till the fight is successful. For this, BJP has supported the agitation. This statement was made by BJP district president, former MLA Dr. Vinay Natu. He had come to Guhagar to meet the S.T. employees.
नातू म्हणाले की, एस.टी.मुळे गावांचा विकास Rural Development झाला. रात्री, अपरात्री सामान्य जनतेच्या हक्काचे वाहन असा विश्र्वास एस.टी. कर्मचाऱ्यांनी निर्माण केला आहे. कोरोना (Covid Pandemic) संकटात अडकलेल्या प्रवाशांना, कामगारांना त्यांच्या घरापर्यंत पोचविण्याचे काम केले. त्यासाठी अनेक चालक वाहन सर्व हॉटेल बंद असताना परराज्यात गेले. त्याशिवाय कोरोना महामारी संदर्भातील अन्य कामातही एस.टी. कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. याचा विचार तारतम्याने करण्याची आवश्यकता होती. मात्र समन्वयाची भूमिका सरकार घेताना दिसत नाही.
आता शासन निलंबनाच्या कारवाईवर आले आहे. यांच्याच आशिवार्दाने सुरु असलेली खासगी वहातूक (Privet Transport) अधिकृत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यापुढे आंदोलन (agitation) मोडून काढण्यासाठी विविध मार्गांचा वापर होईल. अशावेळी तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. हा विश्र्वास देण्यासाठी भाजपने आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सरकारबरोबर चर्चा कामगारांनी करावी. आंदोलनाचे धोरण कर्मचाऱ्यांनी ठरवावे. त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आम्ही जनतेपर्यंत जावू. सरकारने न्याय न दिल्याने एस.टी. कर्मचाऱ्यांना हा संप करावा लागत आहे. हे त्यांना सांगू. समाजमाध्यमांमुळे संपाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचत आहे. जनमानसातही हा संप योग्य मागण्यांकरीता आहे. हीच भावना आहे. ती अधिक दृढ करु. पोलीस दलाचा वापर करुन सरकारने दडपशाही सुरु केली तर जनतेला सोबत घेवून पोलीसांच्या अंगावर जाण्याची आमची तयारी आहे.
त्याचबरोबर न्याय्य मागण्यासाठी सुरु असलेल्या लढ्यात कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य (Moral) निर्णायक क्षणापर्यंत टिकून राहीले पाहिजे. यासाठी भाजपने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (S.T. employees Protest) पाठिंबा दिला आहे. राज्यात कुठेही अडचण असेल तर तेथील भाजपच्या कार्यकर्त्यांना भेटा. आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही निश्चित मदत करु. केवळ आंदोलनाच्या काळातच नव्हेतर आंदोलन संपल्यानंतरही येणाऱ्या संकटांमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत. हे सांगण्याकरीता आज आम्ही आलो आहोत.
यावेळी एस.टी. कर्मचाऱ्यांसह, भाजपचे तालुका सरचिटणीस सचिन ओक, नगरसेवक उमेश भोसले, गजानन वेल्हाळ, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय मालप, शहराध्यक्ष मंदार पालशेतकर आदी उपस्थित होते.
संबंधित बातमी
आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत
व्हिडिओ न्यूज पहा.