विलास मोरे, दुचाकीवर एस.टी. प्रतिकृती बनवून 24 डेपोत प्रवास
गुहागर, ता. 07 : न्याय्य मागण्यांसाठी ST strike लढताना आत्महत्या Suicide करुन, पत्नी, मुले यांना वाऱ्यावर सोडून, संसार उध्वस्थ करु नका. असा संदेश विलास मोरे यांनी 7 जिल्ह्यातील 24 आगारांमधील कर्मचाऱ्यांना ST worker भेटून दिला. त्यासाठी विलास मोरेंनी एस.टी.ची प्रतिकृती बनवलेल्या दुचाकीवरुन 9 दिवसांत 750 कि.मी. प्रवास केला. ST Model on Two Wheeler


महाडचे रहीवासी असलेले विलास मोरे मंडणगड आगारात चालक म्हणून नोकरीला आहेत. विलीनीकरणाच्या लढ्यातील ST strike कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून मंडणगड आगारातील चालक यांनी वेगळीच शक्कल लढवली. आपल्या दुचाकीवर एस.टी.ची प्रतिकृती (ST Model on Two Wheeler) बनवून मोरे 24 आगारांमध्ये फिरले. शिवजयंतीपासून त्यांनी 9 दिवसांत 750 कि.मी. प्रवास केला. खेड, महाड, पोलादपुर, महाबळेश्र्वर, मेढा, सातारा, कराड, इस्लामपुर, कोल्हापूर शहरांतर्गत येणारे शिवाजीनगर, संभाजीनगर आणि मुख्य आगार, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, सांवतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, राजापुर, लांजा, रत्नागिरी, देवरुख, चिपळूण, गुहागर, दापोली या आगारांनी भेटी दिल्या. ST Model on Two Wheeler


विलास मोरे म्हणाले की, आमच्या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या (ST workers’s Suicide) बातम्या ऐकल्या की झोप लागत नसे. न्याय्य मागण्यांसाठी लढताना ST strike पत्नी, मुले यांना वाऱ्यावर सोडून, संसार उध्वस्थ करुन आमचा कर्मचारी आत्महत्या करतो हे मला मान्य नव्हते. म्हणून कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी मी वेगळी शक्कल लढवली. एस.टी. प्रतिकृती तयार करुन 7 जिल्ह्यातील 24 आगारांमध्ये गेलो. तेथील कर्मचाऱ्यांना भेटलो. आत्महत्या करु नका. हे दिवसही संपतील. आपण दरोडेखोर, खुनी नाही. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लढणारे कर्मचारी ST worker आहोत. आजही 60 हजारपेक्षा जास्त कर्मचारी आपल्या सोबत आहेत. असे सांगून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी Moral Support मी हा छोटासा प्रयत्न केला. ST Model on Two Wheeler


माझ्या या प्रवासात कर्मचाऱ्यांबरोबरच लोकांनाही भेटलो. त्यांना आमची भूमिका पटवून दिली. आमच्या लढ्याला समर्थन द्या अशी विनंती केली. रस्त्यावर थांबवून अनेक वाहनचालकांनी, शहरात फिरताना नागरिकांनी प्रतिकृतीचे फोटो काढले. उत्स्फुर्तपणे आम्हांला पाठींबा असल्याचे सांगितले. ST Model on Two Wheeler
विलास मोरेंनी हा 750 कि.मी.चा प्रवास स्वखर्चाने करायचे ठरवले होते. इंधनासाठी सुमारे 3000 रुपये खर्च झाले. पण चहा नाश्ता, जेवण आणि निवासाची व्यवस्था, अन्य सर्व खर्च ठिकठिकाणच्या एस.टी. कर्मचारी बंधु भगिनींनी ST worker केला. या सर्वांचे विलास मोरेंनी आभार मानले. ST Model on Two Wheeler

