गुहागर, ता. 28 : राज्य शासनाने एसटी महामंडळाची दर वाढ लागू करण्यापूर्वीच्या ग्रुप बुकिंग वरील भाडे वाढ प्रवाशी जनतेच्या मागणीचा आदर करीत मागे घेतली आहे. या बद्दल सरकारचे खास आभार आहेच, मात्र याच निर्णयासोबत पूर्वी वैयक्तिक बुकिंग केलेली आहेत त्यांचे वाढीव भाडे पण रद्द करावे, अशी मागणी करीत आहोत ज्यांनी दरवाढ लागू होण्याअगोदर बुकिंग केली आहेत. अशा प्रवाशी नागरिकांना गाडीत बसल्यावर वाढीव तिकीट आकारु नये, अशी मागणी प्रवाशी संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष पराग कांबळे यांनी केली आहे. ST Corporation rate hike
राज्याचे परिवहन मंत्री व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या बाबत नक्कीच विचार करतील असा आशावाद प्रवाशी संघटना व्यक्त करीत आहे. कोकणातील जनतेने श्री. गणेश उत्सवसाठी तब्ब्ल 3 महिने अगोदर बुकिंग केले होते. मात्र नंतर भाडे वाढ लागू झाली त्यामुळे प्रवाशी यांना प्रवास करताना आता गाडीत जादा आकार द्यावा लागेल तो आकारु नये, अशी मागणी प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती प्रवाशी संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष पराग कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ST Corporation rate hike
