राज्यात कोकण अव्वल, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 98.69 टक्के
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील 1474 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. त्यापैकी 598 विद्यार्थी डिस्टीक्शन, 596 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 246 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, 26 विद्यार्थी तृतीय श्रेणीत असे 1466 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा एकूण निकाल 99.45 टक्के इतका लागला आहे. 10 वी च्या परिक्षा झालेल्या 27 केंद्रशाळांपैकी 22 केंद्रशाळांचा निकाल 100 टक्के लागला असून 5 केंद्रशाळांमधील केवळ 8 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
1474 students from Guhagar taluka had appeared for the SSC Board Exam i.e. matriculation examination. Out of which 598 students have passed in distinction, 596 students in first class, 246 students in second class, 26 students in third class and 1466 students have passed. The overall result of the taluka is 99.45 percent. Out of 27 Examination Centers 22 Examination Centers have got 100 per cent results and only 8 out of 5 Examination Centers have failed the 10th.
गुहागर तालुक्यातील 722 विद्यार्थी आणि 752 विद्यार्थीनीनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 719 विद्यार्थी आणि 747 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या.
तालुक्यातील एक्सलंट ॲकेडमी आबलोली, न्यू इंग्लिश स्कूल (इंग्रजी माध्यम) पाटपन्हाळे, शृंगारी उर्दु हायस्कुल शृंगारतळी, न्यू भारत उर्दु हायस्कुल अंजनवेल, महात्मा फुले माध्यमिक विद्यामंदिर पाचेरी आगर, वैद्य माध्यमिक विद्यालय अंजनवेल, माध्यमिक विद्यालय पाचेरी, माध्यमिक विद्यालय मुंढर, न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्र्वर, न्यू इंग्लिश स्कूल वेलदूर, उर्दु हायस्कुल पेवे, माध्यमिक विद्यालय कुडली, माध्यमिक विद्यालय कोळवली, माध्यमिक विद्यामंदिर वाघांबे, पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेत, सरस्वती विद्यामंदिर जामसुत, माध्यमिक विद्यालय आबलोली, आदर्श विद्यालय देवघर, वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे, माध्यमिक विद्यालय अडूर, नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यालय कोतळूक आणि न्यू इंग्लिश स्कूल पडवे या 22 केंद्रशाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल तळवलीच्या केंद्रातील 3 विद्यार्थी, न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळेच्या केंद्रातील 2 विद्यार्थी आणि पांडुरंग रुपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर, हेदवकर विद्यानिकेतन हेदवी या तिन केंद्रांमधील प्रत्येकी 1 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील 414 शाळांमधील 11446 मुले आणि 11060 मुली अशा 22506 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 11250 मुले आणि 10961 मुली उत्तीण झाल्या. रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 98.69 टक्के इतका आहे. तर सिंधुदूर्ग जिल्ह्याचा निकाल 98.93 टक्के आहे.
महाराष्ट्रात कोकण विभाग अव्वल
कोकण 98.77 टक्के
कोल्हापूर विभाग 97.64 टक्के
पुणे विभाग 97.34 टक्के
मुंबई विभाग 96.72 टक्के
अमरावती विभाग 95.14 टक्के
नागपुर विभाग 93.84 टक्के
नाशिक विभाग 93.72 टक्के
लातूर विभाग 93.09 टक्के
औरंगाबाद विभाग 92.00 टक्के
संबंधित बातम्या
पालशेतकर विद्यालयात तन्वी वहाळकर प्रथम
गुहागर हायस्कुलची वेदश्री तालुक्यात पहीली