• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सैन्यदलातील अधिकारी पदासाठी नाशिक येथे ‘एसएसबी’ पूर्व प्रशिक्षण वर्ग

by Mayuresh Patnakar
October 9, 2026
in Ratnagiri
26 0
0
50
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

इच्छुकांसाठी १४ ऑक्टोबरला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखती

रत्नागिरी, ता. 09 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि हवाई दलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र युवक-युवतींना ‘सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड’ (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड (नाशिक) येथे राज्य शासनातर्फे मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ६७ वा एसएसबी प्रशिक्षण वर्ग दिनांक १९ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार असून, जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रत्नागिरी येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवीण बिरादार यांनी केले आहे. ‘SSB’ Preliminary Training Class in Nashik

मुलाखतीस उपस्थित राहताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal (Resources Nashik – SSB 67) वरून किंवा व्हॉट्सॲप क्र. ९१५६०७३३०६ वरून प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रत डाऊनलोड करावी. ती पूर्ण भरून सोबत आणणे बंधनकारक आहे.  ‘SSB’ Preliminary Training Class in Nashik


पात्रतेचे निकष (खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक) :

 * कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) किंवा नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA-UPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.
 * एनसीसी ‘C’ प्रमाणपत्र परीक्षा ‘A’ किंवा ‘B’ श्रेणीत उत्तीर्ण असावे आणि एनसीसी ग्रुप मुख्यालयाने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.
 * टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी (TGC) एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर प्राप्त असावे.
 * युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम (UES) अंतर्गत एसएसबी कॉल लेटर असावे किंवा शिफारस यादीत नाव समाविष्ट असावे.
प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहताना वरील पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com या ईमेलवर अथवा दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ आणि व्हॉट्सॲप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. ‘SSB’ Preliminary Training Class in Nashik

Tags: 'SSB' Preliminary Training Class in NashikGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet13
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.