गुहागर, ता. 25 : गेले काही दिवस बाजारपेठेमध्ये पिकअप शेड हा विषय चर्चेला येत होता. स्थानिक प्रशासन यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत होते. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व तंटामुक्ती समिती व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून पिकअप शेडसाठी उपोषण सुद्धा करण्यात येणार होते. मात्र तहसीलदार यांच्या मार्गदर्शनामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले. अखेर या कामाला सुरुवात झाली. Sringaratali pickup shed work under police supervision
सदर कामाच्या ठिकाणी असलेले व्यापारी यांनी सुद्धा कामास सुरुवात करण्यास चांगले सहकार्य केले. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हे काम नॅशनल हायवेने सुरु केले असून लवकरच हे काम पूर्ण होऊन संपूर्ण तालुक्यातून येणार्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. रस्त्याला असलेले खड्डे भरण्याचे काम व गणपती निमित्त काही दिवस स्ट्रीट लाईट सुद्धा सुरु करण्याचे काम हायवेचे अधिकारी लवकरच ठेकेदार कडून पूर्ण करून देणार आहेत. आणि भविष्यात सदर स्ट्रीट लाईट ग्रामपंचायतला हस्तांतर करण्यात येणार असल्याचे सांगितले. Sringaratali pickup shed work under police supervision

यावेळी उपस्थित गावचे सरपंच विजय तेलगडे, उपसरपंच आसिम साल्हे, पोलीस निरीक्षक सचिन सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश चव्हाण, पोलीस पाटील विशाल बेलवलकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तेलगडे, रुपेश राऊत, सिद्धी जाधव, शब्बीर शेख, चैताली कदम, ग्रामसेवक सौ.बडद, ग्रामस्थ विश्वास बेलवलकर, शाबीर साल्हे, महेश कोळवणकर, अजित बेलवलकर, सत्यप्रकाश चव्हाण, सुधाकर चव्हाण, गौरव वेल्हाळ, सचिन जाधव, संजय भेकरे, दाऊद साल्हे आदी उपस्थित होते. Sringaratali pickup shed work under police supervision