संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील आबलोली पांचाळवाडी येथे श्री.विश्वकर्मा नवरात्र उत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने या ३३ व्या वर्षी माता दुर्गा देवीची मुर्ती स्थानापन्न करण्यात आली आहे. या नवरात्रौ उत्सवानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा, फनी गेम्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. Sri Vishwakarma Navratri Festival at Aabloli

नवरात्रौ उत्सवानिमित्त आज शनिवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्रौ ९:०० वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा व मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी महिलांसाठी फनी गेम्स स्पर्धा, जिल्हा परिषद शाळां मधील विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी शैक्षणिक उपक्रम म्हणून चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. Sri Vishwakarma Navratri Festival at Aabloli


श्री.विश्वकर्मा नवरात्र उत्सव आबलोली पांचाळवाडी येथील दुर्गा देवी ही भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती पसरली आहे. दरवर्षी शेकडो साड्या, खण व नारळाने दुर्गा देवीची ओटी भरुन तिच्या चरणावर लिन होतात. आशिर्वाद घेतात मोठ्या भक्ति भावाने दुर्गा देवीची पुजा करतात व आरती केली जाते. निर्मल ग्रामपंचायत सदस्या सौ. पायल प्रमोद गोणबरे यांच्या सौजन्याने दररोज उत्कृष्ठ दांडिया कलाकाराला दोन ट्रॉफी दिल्या जातात. तसेच मंडळाच्या वतीने दररोज दोन उत्कृष्ठ दांडिया कलाकारांना गोल्ड मेडल बक्षिसे दिली जातात. यामुळे दांडिया रसिकांची खेळण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. Sri Vishwakarma Navratri Festival at Aabloli


श्री.विश्वकर्मा मंडळाचे अध्यक्ष श्री.रमेश शंकर पांचाळ, उपाध्यक्ष श्री.संजय दत्ताराम पांचाळ, सचिव श्री.नितेश सुरेश पांचाळ, खजिनदार श्री.सुधिर वसंत पांचाळ यांच्या अधिपत्याखाली या नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला असून या मंडळाचे सदस्य श्री.अनंत पांचाळ, रामचंद्र पांचाळ,बंडू पांचाळ, चंद्रकांत पांचाळ, मनोहर पांचाळ, सुभाष पांचाळ, दिलीप पांचाळ, रविंद्र पांचाळ, प्रदिप पांचाळ, प्रथमेश पांचाळ, कु.शुभम पांचाळ, कु.विनीत पांचाळ, कु. ऋषीकेश पांचाळ, कु.सर्वेश पांचाळ,सौ.सविता पांचाळ, सौ.रसिका पांचाळ,सौ.रंजना पांचाळ, सौ.निशा पांचाळ, सौ. अनुसया पांचाळ, श्रीमती.सुरेखा पांचाळ, कुमारी.सानिका पांचाळ, कु. दिपक पांचाळ, श्री. सुनील पांचाळ, श्री. जितेंद्र पांचाळ, महेश पांचाळ, श्रीम. लक्ष्मी पांचाळ, सौ. रुपाली रमेश पांचाळ, श्रीम. निर्मला पांचाळ, श्रीम. मोहिनी पांचाळ आदी. मंडळी दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. Sri Vishwakarma Navratri Festival at Aabloli


