मुंबई, ता. 07 : आठवड्याच्या अखेरीस तसेच आगामी सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते मडगावदरम्यान चार विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या १३ आणि १५ ऑगस्ट २०२६ रोजी धावणार असून, कोकण रेल्वे मार्गावरील खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरीसह प्रमुख स्थानकांवर त्यांना थांबे देण्यात आले आहेत. Special trains will run between Mumbai- Madgao
गाडी क्रमांक ०१०२९ ही विशेष गाडी १३ ऑगस्ट (गुरुवार) आणि १५ ऑगस्ट (शनिवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल. ती त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीच्या दोन सेवा असतील.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१०३० ही विशेष गाडी १३ आणि १५ ऑगस्ट रोजी मडगाव येथून दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. या गाडीच्याही दोन सेवा असतील. Special trains will run between Mumbai- Madgao
कोकणातील प्रमुख स्थानकांवर थांबे
या विशेष गाड्यांना दोन्ही दिशेने दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाडीला एकूण २४ डबे असतील. यामध्ये एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, पाच वातानुकूलित तृतीय श्रेणी, १२ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश असेल. Special trains will run between Mumbai- Madgao
आरक्षण ८ ऑगस्टपासून
विशेष गाडी क्रमांक ०१०२९ चे आरक्षण ८ ऑगस्ट २०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर (PRS) तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी सामान्य दराने यूटीएस प्रणालीद्वारे तिकीट उपलब्ध होणार असून प्रवाशांना ‘RailOne’ ॲपचाही वापर करता येणार आहे. गाड्यांच्या थांब्यांची सविस्तर वेळ आणि अन्य माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर अथवा एनटीईएस (NTES) ॲपवर माहिती तपासावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. Special trains will run between Mumbai- Madgao
