• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 October 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

परदेशातील नातेवाईकांसाठी घरचा फराळ पाठवणे झाले अधिक सोपे

by Mayuresh Patnakar
October 17, 2026
in Maharashtra
19 0
0
Special service by the Postal Department
36
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

टपाल विभागातर्फे विशेष सेवा व मोफत पिकअप सुविधा

रत्नागिरी, ता. 17 : दिवाळी सणाच्या निमित्ताने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाईक व मित्रांना घरच्या फराळाची गोडी चाखता यावी, यासाठी टपाल विभागाने (Postal Department) परदेशात फराळाचे पार्सल पाठवण्याची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या सेवेचा विस्तार करण्यात आला असून, जिल्ह्यातील नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे. Special service by the Postal Department

या उपक्रमामुळे परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांना चकली, लाडू, चिवडा, करंजी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

नागरिक आणि शहरातील मिठाई दुकानदारांची गैरसोय टाळण्यासाठी टपाल विभागाने यंदा थेट घरून किंवा दुकानातून पार्सल कलेक्ट (Pick-up) करण्याची विनामूल्य सुविधा दिली आहे. यासाठी इच्छुकांनी 8669919860 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. Special service by the Postal Department

सुरक्षित पॅकिंग आणि नियमांचे पालन आवश्यक:

फराळ परदेशात पाठवताना टपाल विभागाच्या नियमांनुसार योग्य आणि सुरक्षित पॅकिंग करणे अनिवार्य आहे. पार्सलचा आकार, वजन आणि संबंधित देशानुसार पोस्टाचे दर लागू होतील. तसेच फराळ पाठवण्यापूर्वी संबंधित देशातील अन्न आयात नियमांची (Food Import Rules) पूर्वतपासणी करून घेण्याचे आवाहनही टपाल विभागातर्फे करण्यात आले आहे. Special service by the Postal Department

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsNews in GuhagarSpecial service by the Postal Departmentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.