• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथे विशेष परिसंवाद कार्यक्रम

by Guhagar News
May 12, 2026
in Ratnagiri
37 0
0
Special Seminar at Chiplun
72
SHARES
207
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पूर्ती वर्षानिमित्त आयोजन

गुहागर, ता. 12 : भगवा ध्वज हा गुरू मानून संघाचे कार्यकर्ते निरपेक्ष भावनेने गेली शंभर वर्षे काम करत आहेत. संघाचेच नाही तर समाजामध्ये असंख्य व्यक्ती काम करत असतात. या सज्जन शक्ती बरोबर आपण एकत्र येऊन काम करून देशाला परमवैभव प्राप्त करून देऊया, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांत कार्यकारणी सदस्य डॉ. अजित मराठे यांनी केले. Special Seminar at Chiplun

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पूर्ती वर्षाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व प्रबुद्ध नागरिकांशी संवाद साधण्यासाठी चिपळूण येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृह येथे विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. Special Seminar at Chiplun

या कार्यक्रमात उत्तर रत्नागिरी मधील समाजाशी निगडित 50 निमंत्रित व्यक्ती सहभागी झाले होते. यावेळी डॉक्टर अजित मराठे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर पेक्षा अधिक देशात काम करणारी जगातील सर्वात मोठी संघटना आहे. माणूस जोडला म्हणजे देश जोडला जाईल, संस्कारित राष्ट्रभक्त नागरिक तयार करून देशभक्तीने प्रेरणा घेऊन संघ जागृत करतो. हिंदू हा देशाचा कणा आहे. अशा समाजाचा संघटन केले पाहिजे. या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. पाच जणांच्या उपस्थितीत स्थापन झालेली ही संघटना आज करोडो लोक संघाशी जोडले गेले आहेत. स्वातंत्र्य मिळवत असताना हिंदू संघटनेसाठी काम करणारे तरुण तयार केले. समाजाशी एकरूप होण्याची शिकवण डॉक्टर हेडगेवार यांनी दिली. पुढील काळात गोवळकर गुरुजींच्या नेतृत्वाखाली हजारो संघ प्रचारक तयार झाले. संघाची शाखा व काम करणारे प्रचारक हे संघाची ताकद बनले. सुरुवातीला संघाबाबत आकर्षण नंतर चेष्टा व गांधी हत्येनंतर संघाच्या जवळ जाण्याचे लोकांना भीती वाटू लागली. तीन वेळा संघावर बंदी येऊनही संघटना वाढतच गेली. जगभर पसरूनही संघ एनजीओ नाही. भारताच्या संस्कृती, अध्यात्म यामध्ये जगाचा उद्धार करण्याची ताकद आहे. सिंहासन चढण हे संघाचा उद्देश नाही तर देशाला परम वैभवाला नेणं हे संघाचं काम आहे असे मराठे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःहून राजकारणामध्ये उतरले नाहीत तर संघाने तसा आदेश दिला होता. असेही शेवटी सांगितले. यावेळी व्यासपीठावर रत्नागिरी विभाग संघचालक दत्ताजी सोलकर व भाई टोपरे उपस्थित होते. प्रास्ताविक मंदार लेले यांनी केले. Special Seminar at Chiplun

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSpecial Seminar at Chiplunटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.