गुहागर, ता. 26 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे (Patpanhale Education Society) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मा. प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक व मराठी संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांकरीता कोकणातील प्रसिध्द कवी, साहित्यिक व जलसाकार मा. श्री. राष्ट्रपाल सावंत यांचा देशभक्तीपर कविता वाचन व गायनाच्या सांस्क़तिक कार्यक्रमातून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. Social awareness through song singing in Patpanhale
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रमोद देसाई, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जालिंदर जाधव, प्रा. प्रसाद भागवत, डॉ. दिनेश पारखे, प्रा. सौम्या चौगुले, प्रा. लंकेश गजभिये, ग्रंथालय परिचर पर्शुराम चव्हाण, वरीष्ठ लिपिक स्नेहल संसारे, विश्वनाथ कदम, नंदकुमार भेकरे, संदिप चव्हाण, रविंद्र चव्हाण, महेश झगडे व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. Social awareness through song singing in Patpanhale
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिध्द कवी, साहित्यिक व जलसाकार मा. श्री. राष्ट्रपाल सावंत यांना महाविद्यालाचे मा. प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जालिंदर जाधव यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचे स्वरप व त्यामागील हेतू काय याविषयी भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रमोद देसाई यांनी आपल्या मनोगतातून मा. राष्ट्रपाल सावंत यांचा महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक विभागअंतर्गत मुंबई विद्यापिठाच्या 55 व्या सांस्कृतिक महोत्सवासाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. Social awareness through song singing in Patpanhale
यावेळी आपल्या व्याख्यानातून कोकणातील प्रसिद्ध कवी, साहित्यिक व जलसाकार मा श्री. राष्ट्रपाल सावंत यांनी कवि, साहित्यिक हा एक संवेदनशिल, वास्तवतेचे भान असणारा असायला हवा हे त्यांनी आपल्या विविध प्रकाराच्या काव्याच्या आधारे उपस्थित श्रोत्यांना पटवून दिले. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते. सर्वच अनुभव माणसाला वास्तवपणे अनुभवता येईलच असे नाही. परंतू सुसंस्कृत, चांगला माणूस घडण्यासाठी साहित्यांचा अत्यंत गरज आहे. त्याकरीता प्रत्येक विद्यार्थ्यांने वेळ नाही असे न सांगता काहिना काही लिहिले पाहिजे. आपल्याला जे काही वाटते ते मुक्त छंदात का होईना आपल्या भाषेत लिहावे. Social awareness through song singing in Patpanhale
यावेळी त्यांनी आपल्या गद्य-पद्यातील कविता सादर केल्या. त्यामध्ये वाडी वस्तीत घराघरात ध्वज तिरंगा फडकवू या, भारत देश महान, सखु चल शाळा शिकू, भारत देशाच्या सुपुत्रांच्या शौर्याला सलामी, हगनदारी मुक्त गाव, शौचालय बांधायचं, भारत देशासाठी श्रावण मास, बाप, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले, स्वच्छता, अभियान, वास्ववचित्रण करणारी कविता, देशभक्तीपर सामाजिक कविता आपल्या विशिष्ट शैलीत सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकले. यावेळी महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला वर्गातील शुभम जामसूतकर याने ढोलकी व तबला वाजवून सावंत यांच्या गाण्याची दाद दिली. तसेच हास्य कविता, कोकणचे गीत, यासारख्या कवितांचेही सादरीकरण केले. सर्व कवितांमधून लेखक कवींनी संवेदनशिलता, सामाजिक वास्तवतेचे भान कसे राखले पाहिजे याचाच प्रत्यय श्रोत्यांना आला. Social awareness through song singing in Patpanhale
अशा प्रकारचे देशभक्ती व सामाजिक प्रबोधनपर काव्य वाचन व गीतांचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. भालचंद्र चव्हाण व इतर संचालक यांनी प्राचार्य प्रमोद देसाई व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जालिंदर जाधव यांचे अभिनंदन करुन सदर कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. जालिंदर जाधव यांनी केले. उपस्थित मान्यवर व श्रोतृवर्गाचे आभार प्रा. सौम्या चौगुले यांनी मानले. Social awareness through song singing in Patpanhale
