• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 June 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धोपावेत म.ज्योतिबा फुले जयंती व महिला सन्मान सोहळा

by Mayuresh Patnakar
June 24, 2026
in Guhagar
71 1
0
Single Women's Day Celebrated at Dhopave
140
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील ग्रामपंचायत धोपावे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती, अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण आणि एकल महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना अभिवादन केले. Single Women’s Day Celebrated at Dhopave

Single Women's Day Celebrated at Dhopave

ग्रामपंचायतीच्या वतीने समाजकार्यामध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल अंगणवाडी मदतनीस श्रीमती प्रतीक्षा चाळके यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ग्रामपंचायतीच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या सौ. संचिता पवार यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. एकल महिला दिनानिमित्त गावातील विविध वाड्यांमधून निवड करण्यात आलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच पाच-पाच महिलांचे गट तयार करून त्यांनाही गौरविण्यात आले. या उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. Single Women’s Day Celebrated at Dhopave

Single Women's Day Celebrated at Dhopave

या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस, महिला भगिनी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. Single Women’s Day Celebrated at Dhopave

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSingle Women's Day Celebrated at Dhopaveटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.